शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

निलंबितांना पुन्हा सेवेत येण्याची संधी

By admin | Updated: March 14, 2016 02:24 IST

समाजात कायदा व सुव्यवस्थेचे काम करीत असताना जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे गैरकृत्य, कसुरी केल्याप्रकरणी निलंबित असलेल्या कॉन्स्टेबलपासून पोलीस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांना

जमीर काझी, मुंबईसमाजात कायदा व सुव्यवस्थेचे काम करीत असताना जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे गैरकृत्य, कसुरी केल्याप्रकरणी निलंबित असलेल्या कॉन्स्टेबलपासून पोलीस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांना पुन्हा ड्युटीवर हजर होण्याची संधी मिळाली आहे. मात्र, त्यासाठी निलंबन कालावधी व त्यांची चौकशी किमान वर्षभर प्रलंबित असली पाहिजे, तरच त्यांच्या चौकशी, गुन्ह्याच्या शिक्षेला अधीन राहून पुन्हा सेवेत येता येणार आहे.पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्याबाबत राज्य पोलीस दलातील सर्व घटकप्रमुखांना मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. निलंबित प्रकरणे चौकशी व खटल्याविना दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने, अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर व्हावा आणि त्यांच्या सेवेचा खात्यालाही लाभ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता घटकप्रमुखांना आपल्या कार्यक्षेत्रातील दर तीन महिन्यांनी निलंबन प्रकरणाचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर, मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या निर्देशानुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता, नैतिक अध:पतन, लाचलुचपत, खून, खुनाचा प्रयत्न व त्यासारख्या गंभीर प्रकरणात, गुन्हा दाखल किंवा गंभीर गैरवर्तनप्रकरणी संबंधितांविरुद्ध संबंधित न्यायालयात आरोपपत्र किंवा अभियोग दाखल झाल्यास.विभागीय चौकशीत दोषारोप पत्र बजाविल्यानंतरच्या त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या न्यायालयीन कार्यवाही व विभागीय चौकशीच्या अधीन राहून निलंबनातून मुक्तता दोषारोप पत्राव्यतिरिक्त फक्त कर्तव्यात केलेल्या कृताकृत कसुरी (कमिशन-ओमिशन)बाबत विभागीय चौकशी चालू करण्यासंदर्भात चालू करावी किंवा नाही, याबाबत गुणवत्तेवर निर्णय.संबंधिताला न्यायालयाने दोषमुक्त केले असल्यास, त्याविरुद्ध जर वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल असून, कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगनादेश नसलेल्यांना तथापि ज्या प्रकरणात एखाद्यावर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील व एकातून दोषमुक्त असल्यास आणि अन्य गुन्ह्याप्रकरणी चौकशी सुरू असल्यास निलंबनाचा आढावा घेतला जाईल.एक वर्षाच्या आत विभागीय चौकशी संबंधित कार्यवाही पूर्ण झाली नसल्यास.पोलीस अधिनियमानुसार तरतूदवेगवेगळ्या पोलीस घटकांतील कार्यालयातील सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयात भिन्नता असते. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम म्हणजे महाराष्ट्र पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ च्या तरतुदीनुसार पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे.