शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बुधाचे अधिक्रमण पाहण्याची संधी हुकली

By admin | Updated: May 10, 2016 00:55 IST

शतकामध्ये काही वेळा होणारी सूर्यावरील बुधाचे अधिक्रमण पाहण्याची पुणेकरांची संधी हुकली. पुण्यामध्ये नेमके सायंकाळी ढगाळ हवामान असल्याने खगोलप्रेमींनी तयारी करूनही हे दृश्य अनुभवता आले नाही

पुणे : शतकामध्ये काही वेळा होणारी सूर्यावरील बुधाचे अधिक्रमण पाहण्याची पुणेकरांची संधी हुकली. पुण्यामध्ये नेमके सायंकाळी ढगाळ हवामान असल्याने खगोलप्रेमींनी तयारी करूनही हे दृश्य अनुभवता आले नाही. महात्मा गांधी मिशनच्या खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले, ‘‘या अभूतपूर्व घटनेवेळी काढण्यात आलेल्या छायाचित्रांचा फायदा जगभरातील शास्त्रज्ञांना सूर्याचा व्यास मोजण्यासाठी होणार आहे.’’बुधाचे अधिक्रमण सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी पार पडले. सूर्यबिंबावरून बुध सरकताना पाहण्याची अनोखी संधी होती. नागपूर, इचलकरंजी, नांदेड येथील विज्ञानप्रेमींना मात्र हा अनुभव घेता आला. सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळ असणारा बुध ग्रह सूर्यबिंबावरून सरकण्याला अधिक्रमण म्हणतात. राज्यातील खगोलप्रेमींनी छोट्या दुर्बिणीला सोलर फिल्टर लावून, दुर्बिणीचा वापर करून, तर काही जणांनी आरशाद्वारे भिंतीवर सूर्याची प्रतिमा परावर्तित करून सूर्यबिंब पाहिले. एका शतकामध्ये १३ ते १४ वेळेस ही घटना होते. यापूर्वी ८ नोव्हेंबर २००६ ला हे पाहता आले होते. यानंतर ११ नोव्हेंबर २०१९ व १३ नोव्हेंबर २०३२ मध्ये हे दिसणार आहे. पृथ्वी व सूर्य यांच्यादरम्यान बुध व शुक्र हे दोन ग्रह आहेत. शुक्राचे अधिक्रमण फारच दुर्मिळ असते. शतकातून केवळ दोन वेळा ही घटना प्पाहता येते. आठ जून २०१४ व १२ जून २०१२ रोजी शुक्राचे अधिक्रमण पाहता आले होते. यानंतर २११७ व २११५ मध्ये पाहता येणार आहे. साडेसात तास होणारे बुध ग्रहाचे अधिक्रमण जागतिक वेळेनुसार ११ वाजुन १२ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजून ४२ मि.) पार पडले. या वेळी बुध ग्रहाच्या कडेने सूर्यबिंबाला स्पर्श करण्यास सुरुवात केली. यानंंतर केवळ ३ मिनिटे १२ सेकंदानंतर संपूर्ण बुध ग्रह सूर्यबिंबावर दिसण्यास सुरुवात झाली. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५.५० मिनिटांनी ही घटना पाहता आली. या वेळी बुध ग्रह सूर्यबिंबाच्या जवळपास मध्यापर्यंत गेला.