शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला भरारी घेण्याची संधी - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 15, 2016 04:10 IST

जागतिक अर्थकारणातील घडामोडींमुळे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला भरारी घेण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. उद्योजकांना सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य

गौरीशंकर घाळे,  मुंबईजागतिक अर्थकारणातील घडामोडींमुळे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला भरारी घेण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. उद्योजकांना सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, येत्या पाच वर्षांत जागतिक बाजारपेठेवर आपली पकड असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. ‘मेक इन इंडिया सप्ताहा’च्या निमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुलातील मेक इन इंडिया सेंटरमध्ये ‘महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग : आर्थिक वृद्धीसाठी सुवर्णसंधी’ या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील, यांच्यासह वस्त्रोद्योगातील उद्योजक उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हाने उभी आहेत.’ गुंतवणुकीची नवीन क्षेत्र उघडण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील ही आव्हाने आपल्यासाठी मात्र एक संधी आहे. अर्थकारणात अशी संधी वारंवार मिळत नाही. त्यामुळे सरकार, कापूस उत्पादक आणि उद्योजकांनी एकत्रितपणे या संधीचा विनियोग केल्यास, येत्या पाच वर्षांत जागतिक बाजारपेठेवर आपले वर्चस्व असेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात वस्त्रोद्योगाला चांगले भवितव्य आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होते. जिथे कापूस पिकतो, त्याच भागात टेक्साटाइल पार्क व हब उभारण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. कापसाच्या उत्पादनापासून त्याचे ब्रँडेड कपड्यांपर्यंतचा प्रवास एकाच भागात व्हायला हवा. त्यासाठी प्रक्रिया उद्योगांची साखळी उभारण्यावर राज्य सरकार भर देत आहे. वस्त्रोद्योगामुळे हजारो युवकांना रोजगार मिळू शकेल. त्याचबरोबर शेतकरी व उद्योजकांना फायदा होईल. ‘मेक इन इंडिया सप्ताहा’च्या पहिल्या दिवशी रेमंड कंपनीचा सामंजस्य करार झाला. या एका करारामुळे अमरावती परिसरातील २० हजार लोकांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.या वेळी उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, ‘कापूस आणि रेशीम उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या चीनची निर्यात ४० टक्के तर भारताची केवळ ५ टक्के आहे. हेअंतर भरून काढण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात १२ टेक्सटाइल पार्क सुरू करण्यात येत आहेत. राज्य सरकारच्या ‘फार्म टू फॅशन’ या धोरणामुळे राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, ११ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तर राज्यात २५० सूतगिरण्या असून, २०० हून अधिक प्रोसेसिंग युनिट्स आहेत. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात आहे. राज्यात उद्योगासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध असून, उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.तरुण संशोधकांना सहकार्य - मुख्यमंत्रीमुंबई : तरु णांकडील नव-नवीन कल्पना, नवे अविष्कार आणि संशोधन हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे या तरु णांना संशोधनासाठी आणि नवे अविष्कार घडवण्यासाठी सिलिकॉन व्हॅली आणि सिंगापूरसारखे संशोधनपूरक वातावरण निर्माण करणे गरजचे असून महाराष्ट्र सरकार त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ‘महाराष्ट्र इनोव्हेटस्-नेक्स्ट स्टेप’ या विषयावरील चर्चासत्रात फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, वित्त व नियोजन राज्यमंमुख्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिवसुनील पोरवाल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, राज्य शासनाच्या इनोव्हेशन कौन्सिलचे सह अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, राष्ट्रीय इनोव्हेशन फाऊंडेशनचे अनिल गुप्ता, आय ए बी ए चे हरकेश मित्तल, डॉ. रघुनंदन राजामणी, राज्य शासनाच्या इनोव्हेशन कौन्सीलचे सदस्य सचिव डॉ. राजेंद्र जगदाळे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेकी, देशातील उत्तम बुद्धिकौशल्य आणि कल्पकता एकत्र आलेतर या देशाच्या विकासाला अधिक गती मिळेल. त्यासाठी राज्यसरकार सर्वतोपरी सहकार्यकरायला तयार आहे, याचीसुरु वात आम्ही महाराष्ट्रस्टेट इनोव्हेशन कौन्सिलचीस्थापना करून केली आहे. (विशेष प्रतिनिधी)