शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेशाची संधी कायम

By admin | Updated: August 3, 2016 02:02 IST

प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले

पुणे : प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १) संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्यांनी आॅनलाइन प्रक्रियेत अद्याप सहभागच घेतला नाही,अशाही विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीतून प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे काही कारणास्तव अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची संधी अजूनही कायम आहे.राज्याच्या तंत्र शिक्षण विभागातर्फे (डीटीई) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चार फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातही पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवेश फेरीत प्रवेश मिळूनही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंतीक्रम बदलण्याची संधी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळील व चांगल्या महाविद्यालयाची निवड करता आली. त्यातील काही विद्यार्थ्यांनी सोमवारपासून प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु, वंचित विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी प्राप्त व्हावी, या उद्देशाने पाचवी फेरी घेतली जाणार आहे. वेळेत आवश्यक कागदपत्र प्राप्त न झाल्याने पूर्ण अर्ज भरता आला नाही. प्रवेश प्रक्रिया सुरू असताना जे विद्यार्थी प्रवेशास पात्र नव्हते, मात्र आता पात्र झाले आहेत, अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. विद्यार्थी येत्या १ ते ५ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतील. त्याचप्रमाणे याच कालावधीत अ‍ॅडमिशन रिपोर्टिंग सेंटरवर (एआरसी) कागदपत्रांची तपासणी करून अर्ज सबमिट करता येईल. या विद्यार्थ्यांची स्वतंत्र प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. मात्र, पाचव्या फेरीतून महाविद्यालय स्तरावरील कोट्यातील जागांवर आणि शासकीय महाविद्यालयातील रिक्त जागांवरच प्रवेश दिले जाणार आहेत. (प्रतिनिधी)