शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या वेळा बदलण्यास विरोध

By admin | Updated: January 10, 2015 02:24 IST

मुंबईतील कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची सूचना हास्यास्पद असल्याचे सांगत त्यास कडाडून विरोध केला आहे.

प्रभूंच्या सूचनेवर टीका : अनेक संघटनांनी उडवली खिल्लीसंदीप प्रधान - मुंबईमुंबईतील कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची सूचना हास्यास्पद असल्याचे सांगत राज्य सरकार, महापालिका कामगार व कर्मचारी, बँकामधील कर्मचारी, औद्योगिक कामगार अशा सर्वांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. रेल्वेचे अपयश झाकण्याकरिता अशा सूचना करण्याऐवजी रेल्वेसेवेत सुधारणा करावी, असा सल्लाही या संघटनांनी प्रभू यांना दिला आहे.मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रवासात सकाळी व संध्याकाळी होणारी प्रवाशांची गर्दी टाळण्याकरिता कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याची सूचना रेल्वेमंत्री प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यास अनुकूलता दाखवली आहे. मात्र, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष योगिराज खोंडे म्हणाले की, सरकारने अजून अशा कुठल्याही प्रस्तावावर आमच्याशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परस्पर असा निर्णय जाहीर करणे योग्य होणार नाही. सरकारमधील एका खात्याचा दुसऱ्या खात्याशी वरचेवर संबंध येत असतो. त्यामुळे खात्यांकरिता किंवा त्या खात्यांमधील कर्मचाऱ्यांकरिता वेगवेगळ््या कामाच्या वेळा ठरवता येऊ शकत नाही. मुंबई महापालिका कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस महाबळ शेट्टी यांनी रेल्वे मंत्र्यांची ही सूचना अव्यवहार्य असल्याचे मत व्यक्त केले. महापालिका कामगारांना विश्वासात न घेता हा निर्णय लादला तर आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. महापालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रकाश देवदास म्हणाले की, लोकांना मिळणारी सेवा या निर्णयाने प्रभावित होते किंवा कसे याचा सखोल अभ्यास केल्याखेरीज हा निर्णय लागू करता येणार नाही. रेल्वेच्या कारभारात सुधारणा करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास उटगी म्हणाले की, रेल्वेमंत्री प्रभू यांची सूचना हास्यास्पद आहे. उपनगरात बँका सकाळी लवकर काम सुरु करतात तर कफ परेड भागात दहा वाजल्यानंतर काम सुरु करतात. सरकारी कर्मचारी तसेच वेगवेगळी मार्केट यांच्या कामाच्या वेळा गेल्या ४० वर्षांत कामगार, कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार निश्चित केलेल्या आहेत. परंतु उपनगरातील वाढती लोकसंख्या आणि रेल्वे सेवेतील त्रुटी यामुळे प्रवाशांचे हाल होतात. रेल्वेतील कमतरतांवर उपाय करायचे सोडून लोकांनी रेल्वेशी अ‍ॅडजेस्ट करण्याची प्रभू यांची सूचना रेल्वेच्या अपयशावर पांघरूण घालणारी आहे. आयटी कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईलच्प्रभू यांच्या सूचनेचे केवळ बीपीओ, आयटी एम्प्लॉईज कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष अजित सावंत यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, कॉलसेंटर व बीपीओमधील कर्मचारी वेगवेगळ्या वेळी काम करतात. च्आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असतो. कामाच्या वेळा बदलल्या तर त्यांच्यावरील ताण कमी होईल. त्यामुळे आम्ही या सूचनेचे स्वागत करतो.रेल्वेमंत्री प्रभू यांची कल्पनेची भरारी औद्योगिक कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या कामगार आघाडीचे नेते दादा सामंत म्हणाले की, सामान्य जनतेचा संबंध येणारी कार्यालये वेगवेगळ्या वेळांत चालवण्याची प्रभू यांची सूचना म्हणजे कल्पनेची भरारी आहे. औद्योगिक कामगार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतो. बृहन्मुंबईतील सफेद कॉलर कर्मचारी ही सूचना कदापि स्वीकारणार नाही. रेल्वेचे इन्फ्रास्ट्रक्चर न सुधारता केलेली सूचना म्हणजे रेल्वेमंत्र्यांनी शोधलेली पळवाट आहे.महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आगामी बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात केले.