नागपूर : काँग्रेसच्या शासनकाळाला कंटाळून लोकांनी ‘आप’ला संधी दिली. पाच वर्षांसाठी सत्तेवर आलेले ४९ दिवसांत पळाले. त्यामुळे आप व काँग्रेसला पुन्हा संधी कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करीत दिल्लीत आता भाजपालाच संधी असल्याचा आशावाद भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. जम्मू-काश्मीरबाबत विचारले असता ते म्हणाले, की जम्मू-काश्मीरमधील सरकारची मुदत १९ जानेवारीपर्यंत आहे. परंतु तेथील मुख्यमंत्र्यांनी लवकर पद सोडले. ते सोडायला नको होते. (प्रतिनिधी)
भाजपालाच दिल्लीत संधी - राम माधव
By admin | Updated: January 13, 2015 02:53 IST