शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या यादीनंतर मिळणार अर्ज पडताळणीची संधी

By admin | Updated: July 1, 2017 03:07 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपली. मात्र, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपली. मात्र, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे आपण प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडलो, असे वाटल्याने विद्यार्थी तणावाखाली आले, पण पहिल्या यादीनंतर पुन्हा अर्ज पडताळणीची संधी देण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अकरावी प्रवेशात पारदर्शकता यावी, म्हणून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पहिला अर्ज भरला, तेव्हा त्यांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत, पण अर्ज २ भरायला सुरुवात केल्यावर, अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. आॅनलाइन प्रक्रियेत गोंधळ झाल्याने, दोन दिवस अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार, गुरुवार, दि. २९ जूनला सायंकाळी ५ वाजता अर्ज भरण्याची मुदत संपली. या वेळी पहिला अर्जाची ५ हजार ७२२ विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती, तर अर्ज २ ची १ हजार २६७ विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती. अर्ज पडताळणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून पूर्ण होत नाहीत. त्यामुळे हे हजारो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले आहेत, पण हे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले नसल्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी स्पष्ट केले. पहिल्या यादीत या विद्यार्थ्यांची नावे लागणार नाहीत, पण त्यानंतर, विद्यार्थ्यांना पुन्हा अर्जात बदल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्या वेळी हे विद्यार्थी अर्ज पडताळणी पूर्ण करू शकतील, असे चव्हाण यांनी सांगितले.