शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

विरोधकांनी सकारात्मक दिशेने ऊर्जा खर्च करावी

By admin | Updated: May 29, 2017 19:22 IST

‘गेल्या अडीच वर्षात आम्ही राज्यासमोरील सर्व प्रश्न सोडविले असा आमचा दावा मुळीच नाही. पण आम्ही मंडळी प्रामाणिकपणे काम करत आहोत हे जनतेला माहित आहे.

ऑनलाइन लोकमत
क-हाड/मलकापूर, दि.29 - ‘गेल्या अडीच वर्षात आम्ही राज्यासमोरील सर्व प्रश्न सोडविले असा आमचा दावा मुळीच नाही. पण आम्ही मंडळी प्रामाणिकपणे काम करत आहोत हे जनतेला माहित आहे. म्हणूनच विरोधकांनी कितीही रान उठविण्याचा प्रयत्न ककेला तरी जनता ही भाजपबरोबरच असल्याचे अनेक निवडणूकीतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे विरोधकांनीही आपली ऊर्जा उगाच वाया न घालविता सकारात्मक दृष्टीने खर्च करावी. एक दोन गावे दत्तक घ्यावीत असा उपरोधीक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.
क-हाड तालुक्यातील मलकापूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, आमदार महेंद्र लांडगे, प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, निता केळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, डॉ. दिलीप येळगावकर, माजी खासदार गजानन बाबर, विनायक पावसकर, अनुप शहा, स्वप्नील भिंगारदेवे, रामकृष्ण वेताळ, दिपक पवार, जगदीश जगताप आदिंची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर तमाम जनतेचा विश्वास आहे. अन् त्यांच्या नेतृत्वाखालीच या देशाचं  भलं होऊ शकते. त्यामुळे विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रातील यापूर्वीच्या सरकारने शेतीकडे मदत अन् पूनर्वसनच्या पलिकडे कधी बघितलेच नाही.’ असा आरोप करीत फडणवीस म्हणाले, ‘आमचे सरकार मात्र शेतीकडे गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून पहात आहे. २६ हजार कोटी रूपये आम्ही सिंचन योजनांसाठी खर्च करीत आहोत. ठिबक सिंचन योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात म्हणून प्रोत्साहन देत आहोत.’
कृष्णा खोरेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, ‘गत पंधरा वर्षात तत्कालिन सरकारने हे प्रकल्प मार्गी लावणे अपेक्षीत होते. त्यासाठी कोट्यवधींचा निधी आला पण तो कुठे गेला हे समजायला मार्ग नाही. केवळ त्यात भ्रष्टाचार झाल्यानेच हे प्रकल्प मार्गी लागू शकले नाहीत. मात्र, आम्ही हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणे गरजेचे आहे. जमिनीचे तुकडे झाल्याने शेती परवड नाही असे म्हटले जाते. त्यावर उपाय म्हणून समूहशेतीचा प्रयोग आम्ही सुरू केला आहे. कमीत कमी वीस शेतकरी एकत्रित येऊन किमान शंभर एकर शेती करणार असतील तर गटशेतीतून शासनाच्या अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळू शकतो तो त्यांनी घेतला पाहिले.’
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्र हा काँगे्रसचा बालेकिल्ला समजला जात होता. त्याला आता सुरूंग लागला आहे. एकएक बुरूंज ढासळत आहेत. यापूढे भाजपची ताकद आणखीन वाढलेली दिसेल.’
माधव भंडारी म्हणाले, ‘कºहाडच्या नगराध्यक्षा निवडीनंतर पश्चिम महाराष्ट्रात खºया अर्थाने परिवर्तनाला सुरूवात झाली. सातारा जिल्ह्यात दोन्ही काँगे्रसने सुडाचे राजकारण केले असून त्याला भ्रष्टाचाराची जोड दिली. त्यामुळेच दोन्ही काँगे्रसला उतरती कळा येऊ लागली आहे. अन् कोणताच मुद्दा हाती न उरल्याने मतदानयंत्रात घोटाळा झाल्याचा आरोप करीत त्यांचा रडीचा डाव सुरू आहे. त्याला जनता बळी पडणार नाही.’
डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे आदिंची यावेळी भाषणे झाले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब घाडगे यांनी आभार मानले.   
   
अनेकांनी केला भाजपात प्रवेश...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या गळ्यात कमळ चिन्हाचा मफलर देऊन त्यांना प्रवेश देण्यात आला. यामध्ये महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह पाच नगरसेकांचा समावेश आहे. तसेच कºहाड दक्षिण काँगे्रसचे प्रवक्ते मोहनराव जाधव, मलकापूरचे माजी नगराध्यक्षा आबा गावडे, माजी नगराध्यक्षा शारदा खिलारे यांच्यासह नगरसेविका यमुना घाडगे, वनिता लाखे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार यांच्यासह नवल थोरात, अधिक घाडगे, सुधीर पवार, दिलीप चव्हाण, सुनीता धायगुडे, दत्ताभाऊ सावंत, राष्ट्रवादीचे माजी उपजिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, राजू पठाण, अमोल पाटील आदिंचा समावेश आहे.