शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-मुंबई कॉरिडॉरला शेतक-यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:32 IST

राज्यातील समृद्धी महामार्गासोबतच, आता दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पालाही शेतक-यांनी विरोध केला आहे. प्रशासनाकडून सक्तीने जमीन संपादन सुरू असल्याचा आरोप करत

मुंबई : राज्यातील समृद्धी महामार्गासोबतच, आता दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पालाही शेतक-यांनी विरोध केला आहे. प्रशासनाकडून सक्तीने जमीन संपादन सुरू असल्याचा आरोप करत, रायगड कॉरिडॉरविरोधी शेतकरी संघर्ष समितीने १ आॅगस्टपासून माणगाव प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे, शिवाय या प्रकल्पाविरोधात १५ दिवसांत उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.महाजन म्हणाल्या की, कागदोपत्री सक्ती केली जात नसल्याचे शासन म्हणत असले, तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासन आणि गावातले दलाल जबरदस्तीने जमिनी संपादन करण्याचा संदेश देत आहेत. शेतकºयांच्या सह्या ज्या संमतीपत्रकावर घेतल्या जात आहेत, त्यात २०१३ च्या जमीन संपादन कायद्याला बगल देण्यात आली आहे. सरसकट एकरी १८ लाख ४० हजार रुपये भाव ठरवण्यात आला असून, घरे, झाडे, विहीर अशा गोष्टींचे मूल्यांकन केलेले नाही.धक्कादायक बाब म्हणजे, शेतकºयांकडून संमती पत्रकात ‘आम्ही नोकरी वा वाढीव नुकसानभरपाई मागणार नाही,’ असे लिहून घेतले जात आहे. शिवाय या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा अधिकारही संमती पत्रकात हिरावून घेण्यात आला आहे. त्यामुळे हे संमती पत्रक म्हणजेच शेतकºयांची शुद्ध फसवणूक आहे. या फसवणुकीच्या आणि शासनाच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराविरोधात मंगळवारपासून माणगाव प्रांत कार्यालयासमोर रमेश साळसकर, चिंतामण म्हस्के, संतोष कालवणकर, सुप्रिया झुमरे, शिवाजी नाडकर, क२ाशिनाथ वाढवळ या शेतकरी बांधवांसोबत बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.त्यामुळे सक्तीचे जमीन संपादन थांबवून, ६८ गावांतील शेतकºयांच्या सातबारावरील संपादनाचे शिक्के उठवा, तसेच फसवणुकीचे व्यवहार रद्द करून, या प्रकरणाची विशेष समितीकडून चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.