शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या खर्चाला विरोध

By admin | Updated: December 26, 2016 04:53 IST

रबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत हजेरी लावली.

मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत हजेरी लावली. या स्मारकाच्या उभारणीसाठी ३ हजार ६०० कोटींचा निधी खर्च होणार आहे. या स्मारकाच्या कोट्यवधींच्या उधळणीला विरोध करीत, दाखल करण्यात आलेल्या आॅनलाइन याचिकेवर मागच्या दोन दिवसांत तब्बल ५५ हजार सामान्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. शिवस्मारकावर होणारी अवाजवी गुंतवणूक ही करदात्यांच्या खिशातूनच होते आहे. त्यामुळे या अवाजवी खर्चाला विरोध करीत मुंबईतील अनेक सुविधांचा विकास करावा, अशी भूमिका घेत शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या आॅनलाइन याचिकेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या कोट्यवधींच्या गुंतवणुकीऐवजी शिक्षण, अन्न, पायाभूत सुविधांच्या विकास करावा, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या आॅनलाइन याचिकेची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. दोन दिवसांत ५५ हजार जणांनी याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, तर आतापर्यंत ३२ हजार २१४ जणांनी याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भूमिपूजन सोहळ््याच्या निमित्ताने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि टिष्ट्वटरवर या याचिकेची चर्चा आहे. (प्रतिनिधी)