शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक पळपुटे, गोंधळालाच प्राधान्य

By admin | Updated: December 24, 2015 02:24 IST

विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी पक्षात उदासीनता होती. बेछूट आरोप करत गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले.

नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी पक्षात उदासीनता होती. बेछूट आरोप करत गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले. महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची व उत्तराला थांबायचे नाही, असे पळपुटेपणाचे धोरण त्यांनी स्वीकारले होते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अधिवेशन संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालविला. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे व उत्तराच्या वेळी गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले. परंतु सत्तापक्षाने सकारात्मक भूमिका घेतली. अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पाच मंत्र्याविरोधात आरोप करणाऱ्यांनी हवे तर जनहित याचिका दाखल करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या चार वर्षांत नापिकी असल्याने संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने निर्णय देखील घेण्यात आले. विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी केली जाते. परंतु मागील ७ हजार कोटींच्या कर्जमाफीत विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. याचा लाभ प्रामुख्याने बँकांना झाला. ही बाब विचारात घेता शेतकऱ्यांसाठी १०५१२ कोटींचा विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यातून दुष्काळाने बाधित १५७४७ गावांतील शेतकऱ्यांना मदत, ५३ लाख १९ हजार शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपात ७४१२ कोटींची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजवर जे विदर्भाला मिळाले नाही ते मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.पत्रपरिषदेला महसूलमंत्री एकनाथ खडसे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)