शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मतपरीक्षा आज

By admin | Updated: October 15, 2014 01:44 IST

विधानसभा निवडणुकीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गत दोन आठवड्यांपासून प्रचाराच्या माध्यमातून तयारीला लागलेल्या जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ मतदारसंघातील २११ उमेदवारांची बुधवारी १५ रोजी

नागपूर : विधानसभा निवडणुकीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गत दोन आठवड्यांपासून प्रचाराच्या माध्यमातून तयारीला लागलेल्या जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ मतदारसंघातील २११ उमेदवारांची बुधवारी १५ रोजी मतदानाच्या माध्यमातून परीक्षा आहे. मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याचा निर्णय रविवारी मतमोजणीनंतर होणार आहे.दरम्यान जिल्हा प्रशासनाने मतदानाची संपूर्ण तयारी केली असून बुधवारी सकाळी ७ वाजतापासून जिल्ह्यातील ४१२० मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी ६ पर्यंत चालेल. जिल्ह्यात ३७,०४,६७६ मतदार आहेत. त्यांच्यासाठी ४१२० मतदान केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडे १० हजार इव्हीएम आहेत. त्यापैकी ७४६० लागणार असून उर्वरित राखीव असणार आहेत. विविध केंद्रावर २३८१८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी साहित्य वाटपाची प्रक्रिया मंगळवारी सकाळी सुरूझाली. कर्मचारी रात्रीच मतदान केंद्रावर पोहचले असून बुधवारी सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वी प्रथम उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर यंत्रणांची चाचणी घेण्यात येईल व नंतर मतदानाला सुरुवात होईल.प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदारांसाठी आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ५० संवदेनशील (क्रिटिकल) केंद्र आहेत. तेथे पोलिसांची विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे.जिल्ह्यात कामठी (उमेदवारांची संख्या १४), सावनेर (उमेदवारांची संख्या १५), रामटेक (उमेदवारांची संख्या १४) आणि उमरेड (उमेदवारांची संख्या १५) मतदारसंघाचा अपवाद सोडला तर शहरातील सहा आणि ग्रामीणमधील काटोल, हिंगणा या मतदारसंघात उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त असल्याने या सर्व ठिकाणी प्रत्येक केंद्रावर मतदानासाठी दोन ईव्हीएमची व्यवस्था करण्यात आली आहे.अपंगांची स्वतंत्र नोंदमतदानासाठी आलेल्या अपंग मतदारांची मतदानाच्यावेळी स्वतंत्रपण नोंद केली जाणार आहे. तसे आदेश आयोगाने दिले आहेत. (प्रतिनिधी)