शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

शासन मागविणार अ‍ॅटर्नी जनरलांचे मत

By admin | Updated: June 14, 2014 04:42 IST

मुंबईतील कॅम्पा कोला सोसायटीच्या विषयावर अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांचे मत मागविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : मुंबईतील कॅम्पा कोला सोसायटीच्या विषयावर अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांचे मत मागविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारच्या बैठकीत घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान आणि राज्यमंत्री सचिन अहिर यांनी शुक्रवारी बैठकीत कॅम्पा कोलाचा विषय उपस्थित केला. सरकारने मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या ठिकाणी ३० वर्षांपासून रहिवासी राहत आहेत. जर त्यांचे फ्लॅट बेकायदेशीर होते तर महापालिकेचे अधिकारी आणि बिल्डरविरुद्ध कारवाई का केली नाही, असा प्रश्न नसीम खान यांनी केला. दरम्यान, इमारतींच्या बेकायदा मजल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने १७ जून ही तारीख निश्चित केली असतानाच रहिवाशांनी चक्क १४ अटींचे एक निवेदनच महापालिकेला धाडले आहे. मात्र महापालिकेने कॅम्पा कोलावासीयांचे हे १४ अटींचे निवेदन धुडकावून लावले आहे.या निवेदनात रहिवासी म्हणतात, मुंबई आणि राज्यातील अनधिकृत बांधकामे पाडली जातील आणि एकही अनधिकृत इमारत नियमित केली जाणार नाही. सध्याची अथवा भविष्यातील सरकारकडून अनधिकृत बांधकामे नियमित करण्याविषयी अध्यादेश काढला जाणार नाही; तसे केले तर संबंधित मंत्री अथवा अधिकाऱ्याविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवला जाईल.आम्हाला फसवणारे विकासक आता हयात नसल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर खटला भरला जाईल. तसेच त्यांची मालमत्ता विकून बेघर होणाऱ्या रहिवाशांना नुकसानभरपाई दिली जाईल. विकासकांना नियमबाह्य बांधकामाला मंजुरी देऊन या प्रकरणाला जबाबदार ठरलेल्या निवृत्त किंवा सध्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी होईल. शिवाय त्यांची मालमत्ता जप्त केली जावी, अशा अटींचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)