शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका

By admin | Updated: January 7, 2017 01:28 IST

महापालिका निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध विकास प्रकल्पांची उद्घाटने व कार्यक्रमांच्या आयोजनाचा धडाका सुरू आहे. महापालिका निवडणूक अवघ्या सव्वा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व महोत्सवाचे कार्यक्रम तातडीने घेतले जात आहेत. सध्या अनेक विद्यमान नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या कामांचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, नेत्यांची वेळ मिळणे अडचणीचे झाले आहे. अनेक कामे पूर्ण झालेली असतानाही निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करण्यासाठी विद्यमान नगरसेवकांना आचारसंहिता लागू होण्याची धास्ती आहे. यंदा चार सदस्यीय प्रभागपद्धती असल्याने प्रभागाचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचताना इच्छुकांना पायपीट करावी लागणार आहे. अधिकाधिक मतदारांंपर्यंत पोहोचता यावे यासाठी मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्चही केला जात आहे. प्रत्यक्षरीत्या भेटता येत नसले, तरी अनेकांनी मोठ्या कार्यक्रमांतून निवडणुकीबाबत इच्छुकता स्पष्ट केली आहे. (प्रतिनिधी)नेत्यांची मिळेना वेळ...महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक प्रभागातील नगरसेवक रस्ते व विकासप्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटनांचे कार्यक्रम घेताना दिसत आहे. शिवाय इच्छुकांकडून सांस्कृतिक कार्यक्रम व मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले जात आहे. नेत्यांना आपली ताकद दाखविण्यासाठी प्रभागात निमंत्रित केले जाते. परंतु, प्रत्येक राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची वेळ कार्यक्रमांसाठी मिळविणे जिकरीचे झाले आहे. >कार्यक्रमांची रेलचेल...मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह विविध स्पर्धा, साहित्यवाटप केले जात आहे. यासह मतदारांसाठी दूरदूरच्या सहलींचेही आयोजन केले जात आहे. यासह विद्यमान नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या कामांचे उद्घाटन करण्यावरही भर दिला जात आहे. तर इतर इच्छुकांनी साहित्य वाटपासह मतदारांसाठी छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. आचारसंहिता काळात असे कार्यक्रम आयोजन करण्यावर मर्यादा येतात. निवडणूक खर्चातही त्याचा समावेश केला जातो. यामुळे इच्छुकांनी आताच कार्यक्रमांचा धडाका लावला असल्याचे दिसून येत आहे.