शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिहीनांसाठी आॅनलाइन विश्व खुले

By admin | Updated: January 4, 2017 00:02 IST

लुई ब्रेल याने लिपी तयार करून दृष्टिहीनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. सध्याच्या आधिनिक तंत्रज्ञानाच्या युगात जॉस (jaws), टॉक बॅक (Talk back) यासारख्या स्क्रीन रीडर

- चंद्रकांत कित्तुरे, कोल्हापूर

लुई ब्रेल याने लिपी तयार करून दृष्टिहीनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. सध्याच्या आधिनिक तंत्रज्ञानाच्या युगात जॉस (jaws), टॉक बॅक (Talk back) यासारख्या स्क्रीन रीडर तंत्रज्ञानाने दृष्टिहीनांसाठी आॅनलाईन विश्वदेखील खुले झाले आहे.लहानपणी अपघाताने दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या ब्रेल यांनी आठ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर १८२९ मध्ये स्पर्शज्ञानाने लिहिता, वाचता येणारी सहा बिंदूंची लिपी शोधून काढली. दृष्टिहीन लोकांना नवी दृष्टी देणारी ही भाषा ‘ब्रेल लिपी’म्हणून जगभरात मान्यता पावली. आज, बुधवारी ब्रेल यांची २०८ वी जयंती आहे. या ब्रेल लिपीचा पुढचा टप्पा म्हणजे स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरचा शोध. या सॉफ्टवेअरने दृष्टिहीनांसाठी अवघे आॅनलाईन विश्वच खुले केले आहे. जॉस प्रामुख्याने संगणकासाठी, तर टॉक बॅक मोबाईलसाठीचे सॉफ्टवेअर आहे. यामुळे दृष्टिहीन व्यक्ती केवळ स्पर्शाद्वारे संगणक, मोबाईल हाताळू शकते, वृत्तपत्र, पुस्तके वाचू शकते; पण हे सॉफ्टवेअर खूप महागडे आहे. ५० ते ६० हजार रुपये त्यासाठी मोजावे लागतात. शासकीय नोकरीतील दृष्टिहीन कर्मचाऱ्यांना शासनाकडून ते मिळते. इतर दृष्टिहीनांनांसाठी शासनाने ते सवलतीच्या दराने किंवा मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी दृष्टिहीन मित्रांची मागणी आहे.भारतात दीड कोटीहून अधिक दृष्टिहीनजगभरातील दृष्टिहीनांची संख्या साडेचार कोटींहून अधिक आहे. त्यात भारतातील सुमारे दीड कोटी दृष्टिहीनांचा समावेश आहे. कसे होते वाचन?जॉस किंवा टॉक बॅक हे सॉफ्टवेअर व्हॉईस ओव्हरद्वारे स्क्रीन रीडरचे काम करते. दिलेल्या आदेशाप्रमाणे मजकुराचे (टेक्स्ट स्पीच) वाचन करते. ते दृष्टिहीनांना ऐकायला मिळते. व्हॉईस ओव्हरच्या माध्यमातून आपण काय करीत आहोत हे कळते. त्यानुसार आपल्याला हवा तो आदेश देता येतो. एखादी वेबसाईट ओपन करणे, बातमी वाचणे, ई-मेल करणे, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारखे सोशल मीडिया हाताळणे हे सर्व करता येते. गुगल मॅप्सच्या आधारे ते एकट्याने प्रवासही करू शकतात.स्मार्टफोन किंवा आयफोनसारख्या महागड्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर इनबिल्ट असते. शासनाने दृष्टिहीनांना सवलतीच्या दराने स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावेत. -सतीश नवले, सचिव, प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लार्इंड.