शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाचे ‘विशाखा’, ‘रुक्मिणी’ पुरस्कार जाहीर

By admin | Updated: February 15, 2016 20:29 IST

येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रतील उल्लेखनीय योगदानासाठीचे 2015 चे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

 नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रतील उल्लेखनीय योगदानासाठीचे 2015 चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘विशाखा’ व ‘रुक्मिणी’ पुरस्काराचे वितरण 12 मार्चला, तर डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार व बाबूराव बागुल पुरस्काराचे वितरण 21 एप्रिल रोजी होईल.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे ‘विशाखा’ काव्य पुरस्कार दिले जातात. त्यात 21 हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार नेरूर (कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील कवी अरुण नाईक यांच्या ‘अंधारवतरुळातील वेदनापट’, 15 हजारांचा द्वितीय पुरस्कार लोणंद (माळशिरस, पुणे) येथील कवयित्री बालिका बिटले यांच्या ‘मॅगेङिानीतून सुटतेय गोळी’ तर 10 हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार जळगाव येथील कवयित्री तथा ‘लोकमत’च्या वरिष्ठ मुद्रितशोधक डॉ. अस्मिता गुरव यांच्या ‘तूर्त इतकंच’ काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर तर प्रेरणा केशव सहाणो (सांगवी, पुणो) यांना  रुक्मिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 21 हजार रुपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. साहित्यिक बाबूराव बागुल कथालेखन पुरस्कारासाठी गोंदी (अंबड, जालना) येथील विजय जाधव यांच्या ‘दाखला’ कथासंग्रहाची निवड झाली आहे. (प्रतिनिधी)