शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी वायुनंदन

By admin | Updated: March 6, 2017 19:29 IST

बुधवारी पदभार स्वीकारणार ;दोन महिन्यांपासून कुलगुरू निवडीची प्रक्रिया

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती डॉ. सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी डॉ. वायुनंदन यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. गेल्या दोन महिन्यांपासून कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होती. कुलगुरूपदासाठी विक्रमी अर्ज आल्याने या निवडीकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागले होते. बुधवारी वायुनंदन पदभार स्वीकारणार आहेत. डॉ. माणिकराव साळुंखेयांनी १९ आॅगस्ट २०१६ मध्ये मुदतीपूर्वीच कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्याने कुलगुरूपद रिक्त होते. साळुंखे यांच्या राजीनाम्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरू होती. दोन महिन्यांपासून नूतन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होती. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. डॉ. वायुनंदन यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून लोकप्रशासन या विषयात एम.ए.एम.फील तसेच पीएचडी प्राप्त केली असून, उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन तसेच संशोधनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे. कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. मोहीम शाह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती स्थापन करण्यात आली होती. दिल्लीच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. अजयकुमार शर्मा तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी वायुनंदन यांच्या नियुक्तीची घोषणा केली.