शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रकिया जाहीर

By admin | Updated: July 11, 2016 21:43 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला २१ जुलैपासून सुरूवात होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला २१ जुलैपासून सुरूवात होणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, म्हणून विविध ठिकाणी अभ्यासकेंद्रातूनही माहिती दिली जाणार आहे. पदवी, पदव्युत्तरच्या ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे निकाल मिळालेले नाहीत, त्यांनी पुढील वर्षासाठी कायम नोंदणी क्रमांकाचा वापर करून प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले आहे. साळुंखे म्हणाले की, मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठीचे नियमित प्रवेश हे २१ जुलै ते ३१ आॅगस्टदरम्यान आॅनलाइन नोंदणी करून घेता येतील. तर विलंब शुल्कासह १ ते १५ सप्टेंबर आणि अतिविलंब शुल्कासह १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी असेल....................आयडॉल प्रवेशाला मुहूर्त कधी?एकीकडे मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा झाली असली, तरी मुंबई विद्यापीठातून दूरस्थ शिक्षण देणाऱ्या आयडॉलला मात्र प्रवेशाचा मुहूर्त सापडत नाही आहे. गेल्यावर्षी २५ जूनला आयडॉलच्या पदवी, पदव्युत्तर प्रवेशाची प्रकिया सुरू झाली होती. मात्र यंदा जुलै महिना अर्धा संपला, तरी प्रवेश प्रक्रिया घोषित केलेली नाही. मुंबई आणि नजीकच्या परिसरातील हजारो विद्यार्थी आयडॉलच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत आहेत.