शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिहीन व्यक्तींसाठी आॅनलाईन विश्व खुले

By admin | Updated: January 4, 2017 01:09 IST

तंत्रज्ञानाची किमया : व्हाईस ओव्हर सॉफ्टवेअरद्वारे हाताळता येतो संगणक, मोबाईल; आधुनिक ब्रेल

चंद्रकांत कित्तुरे--कोल्हापूर --लुई ब्रेल याने लिपी तयार करून दृष्टिहीनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जॉस (्नं६२), टॉक बॅक (ळं’‘ ुंू‘) यासारख्या स्क्रीन रीडर तंत्रज्ञानाने दृष्टिहीनांसाठी आॅनलाईन विश्वदेखील खुले झाले आहे.लहानपणी अपघाताने दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या ब्रेल यांनी आठ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर १८२९ मध्ये स्पर्शज्ञानाने लिहिता, वाचता येणारी सहा बिंदूंची लिपी शोधून काढली. दृष्टिहीन लोकांना नवी दृष्टी देणारी ही लिपी ‘ब्रेल लिपी’ म्हणून जगभरात मान्यता पावली. आज, बुधवारी ब्रेल यांची २०८ वी जयंती आहे. या ब्रेल लिपीचा पुढचा टप्पा म्हणजे स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरचा शोध. या सॉफ्टवेअरने दृष्टिहीनांसाठी अवघे आॅनलाईन विश्वच खुले केले आहे. जॉस प्रामुख्याने संगणकासाठी, तर टॉक बॅक मोबाईलसाठीचे सॉफ्टवेअर आहे. यामुळे दृष्टिहीन व्यक्ती केवळ स्पर्शाद्वारे संगणक, मोबाईल हाताळू शकते, वृत्तपत्र, पुस्तके वाचू शकते; पण हे सॉफ्टवेअर खूप महागडे आहे. ५० ते ६० हजार रुपये त्यासाठी मोजावे लागतात. शासकीय नोकरीतील दृष्टिहीन कर्मचाऱ्यांना शासनाकडून ते मिळते. इतर दृष्टिहीनांसाठी शासनाने ते सवलतीच्या दराने किंवा मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी दृष्टिहीन मित्रांची मागणी आहे.कसे होते वाचन? जॉस किंवा टॉक बॅक हे सॉफ्टवेअर व्हॉईस ओव्हरद्वारे स्क्रीन रीडरचे काम करते. दिलेल्या आदेशाप्रमाणे मजकुराचे (टेक्स्ट स्पीच) वाचन करते. ते दृष्टिहीनांना ऐकायला मिळते. व्हॉईस ओव्हरच्या माध्यमातून आपण काय करीत आहोत, हे त्यांना कळते. त्यानुसार आपल्याला हवा तो आदेश देता येतो. एखादी वेबसाईट ओपन करणे, बातमी वाचणे, ई-मेल करणे, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारखे सोशल मीडिया हाताळणे हे सर्व करता येते.साडेचार कोटीजगभरातील दृष्टिहीनदीड कोटीभारतातील दृष्टिहीनस्मार्टफोन किंवा आयफोनसारख्या महागड्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर इनबिल्ट असते. शासनाने दृष्टिहीनांना सवलतीच्या दराने स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावेत.-सतीश नवले, सचिव, प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लार्इंड.