शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत खुलेआम कॉपी

By admin | Updated: March 19, 2017 00:37 IST

दहावी व बारावीच्या परीक्षेत येथे खुलेआम कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन परीक्षेतील गैरप्रकाराला अटकाव करु शकलेले नाही.

पाथर्डी (अहमदनगर) : दहावी व बारावीच्या परीक्षेत येथे खुलेआम कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन परीक्षेतील गैरप्रकाराला अटकाव करु शकलेले नाही. पुणे बोर्डापर्यंत कॉपी रॅकेटचे धागेदोरे आहेत की काय?, अशी शंका त्यामुळे निर्माण झाली. परीक्षेतील गैरप्रकारांमुळे पाथर्डी तालुला बदनाम झाला आहे. पाथर्डीत जिल्ह्याबाहेरील शेकडो मुले दहावी, बारावीची परीक्षा देतात. वर्षभर शाळा, कॉलेज न येता ही मुले थेट परीक्षेलाच येतात. परीक्षेच्यावेळी शहरातील बहुतांश लॉज भरलेले असतात. मुलांना विविध शाळांत प्रवेश देणे, त्यांना कॉप्या पुरवून उत्तीर्ण करणे हा एकप्रकारे येथे उद्योगच बनला आहे. त्याचे मोठे रॅकेटच कार्यरत आहे.‘लोकमत’ने याबाबत सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केल्यानंतर शिक्षण विभागाने जिल्ह्याबाहेरील किती मुलांनी पाथर्डीत प्रवेश घेतलेला आहे, याची चौकशी शिक्षण विभागाने सुरु केली आहे. मात्र, जिल्ह्याबाहेरील मुले आमच्याकडे नाहीत, असे हमीपत्र चौकशी समितीला देऊन काही शाळा आपला बचाव करत आहेत. शाळांचे सर्व दप्तर तपासल्यानंतर राज्यातील कॉपी रॅकेटचा प्रकार समोर येईल. परगावच्या एवढ्या मुलांना प्रवेश कसे मिळाले व परीक्षा मंडळानेही मुलांना येथे परीक्षा देण्यास परवानगी कशी दिली?, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी) आता पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार सुरूगुरुवारी भूमितीच्या पेपरला प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांच्या पथकाने विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन बारा विद्यार्थ्यांवर कारवाई केली. परंतु भरारी पथक जाताच पुन्हा खुलेआम कॉपी सुरु झाली. कॉपी रोखण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार यांची पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, त्यांना कोणी दाद देत नसल्याचे चित्र आहे. पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून कॉपीबहाद्दरांचा अटकाव शिक्षण विभाग करु शकतो. मात्र, शिक्षण विभाग त्यात टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे आता पत्रकारांनाही धमकावण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. कॉपीप्रकरणाची समिती चौकशी करीत असल्यामुळे कोणत्या शाळांमध्ये जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी आहेत, याबाबत प्रसारमाध्यमांना कोणतीच माहिती देता येणार नाही.- लक्ष्मण पोले, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी