शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

काम असेल तरच पालिकेत थांबा!

By admin | Updated: July 2, 2016 02:00 IST

महापालिकेत नवीन आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यासह नागरिकांच्या भेटीची वेळही निश्चित केली

पिंपरी : महापालिकेत नवीन आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यासह नागरिकांच्या भेटीची वेळही निश्चित केली आहे. अशातच आता महापालिका भवनातील चारही मजल्यांवरील गॅलरीतील कॅम्पसमध्ये विनाकारण उभे राहण्यास नागरिकांना मज्जाव केला आहे. ही शिस्त महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी लावली आहे.महापालिका भवनाची इमारत चार मजल्यांची आहे. तळमजल्यात नगररचना, लेखा विभाग, करसंकलन, नागरवस्ती आदी विभाग आहेत, तर पहिल्या मजल्यावर स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा विभाग आणि दुसऱ्या मजल्यावर बांधकाम परवाना, वैद्यकीय आणि स्थानिक संस्था कर या विभागांसह शिक्षण मंडळ हे महत्त्वाचे विभाग आहेत, तर तिसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता यासह इतर पक्षांची कार्यालये आहेत. चौथ्या मजल्यावर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयांसह प्रशासन, संगणक, आकाशचिन्ह परवाना हे विभाग आहेत. महापालिकेत विविध कामानिमित्त दिवसभरात अनेकजण येत असतात. त्यामुळे महापालिकेत वर्दळ असते. अनेकदा संबंधित विभागाच्या कार्यालयाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली असते. यामुळे इतर नागरिकांना त्रास होतो. शिवाय कार्यालयापर्यंत जाण्यासही अडचण निर्माण होते. अनेक जण कॅम्पसमधील गॅलरीच्या कठड्यावरून खाली डोकावत असतात. कठड्यावर पिशव्या, बॅगा ठेवून काहीजण गप्पा मारत उभे असतात. त्यामुळे आता महापालिकेच्या चारही मजल्यांवरील मोकळ्या कॅम्पसमध्ये विनाकारण उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. कार्यालयासमोरील मोकळ्या कॅम्पसमध्ये कोणीही उभे राहू नये, यासाठी चारही मजल्यावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. मजल्यावरील विभागाच्या कार्यालयासमोरील मोकळ्या कॅम्पसमध्ये कोणी उभे राहिल्यास त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. कार्यालयात काम असल्यास कार्यालयात बसण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.(प्रतिनिधी)>आढावा बैठक घेऊन शिस्त लावण्याचा प्रयत्नतिसऱ्या मजल्यावर पदाधिकाऱ्यांची कार्यालये असल्याने त्यांच्याकडे पदाधिकारी येण्याचेही प्रमाण अधिक असते. त्यामुळे तिसरा मजला नेहमीच गजबजलेला असतो. नागरिकांना शिस्त लागावी यासाठी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये उभे राहण्यास मनाई केली आहे. नवीन आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक केले. यासह नागरिकांच्या भेटीची वेळदेखील निश्चित करण्यात आली. वेळोवेळी आढावा बैठक घेत कामकाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. माजी महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीनंतर महापालिकेत शिस्तीची घडी विस्कटली होती. ती पुन्हा बसविण्याचा प्रयत्न नवीन आयुक्त करत आहेत.अनेकजण विनाकारण गॅलरीत उभे राहत असल्याचे निदर्शनास आल्याने अतिरिक्त आयुक्त यांनी हा परिसर मोकळा ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. - एस. डी. चौधरी, सुरक्षा अधिकारी