शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय असेल तरच होता येईल आता नगरसेवक

By admin | Updated: December 2, 2015 04:22 IST

महापालिका, नगरपालिकांचे सदस्य होण्यासाठी स्वत:च्या निवासस्थानी शौचालय असणे आणि त्याचा वापर करणे अनिवार्य करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : महापालिका, नगरपालिकांचे सदस्य होण्यासाठी स्वत:च्या निवासस्थानी शौचालय असणे आणि त्याचा वापर करणे अनिवार्य करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याआधी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी संबंधित उमेदवाराच्या निवासस्थानी शौचालयाची सुविधा उपलब्ध असणे आणि त्या सुविधेचा ते नियमितपणे वापर करीत असणे अनिवार्य करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी)च्या धर्तीवर राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)ची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानात शहरांमधील उघड्यावर शौचास जात असलेल्या कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे हा एक महत्त्वाचा कार्यक्र म आहे.या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरातील लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी शहरातील सर्व लोकप्रतिनिधींकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध असणे आणि त्या सुविधेचा नियमितपणे वापर करणे आवश्यक करण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)पूर्णवेळ शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणीव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील अशासकीय अनुदानित शाळांतील व्यवसाय तसेच द्विलक्षी अभ्यासक्र म राबविणाऱ्या संस्थेतील पूर्णवेळ शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील शिक्षकांप्रमाणेच पाचव्या वेतन आयोगातील वेतनश्रेण्यांचा लाभ १ एप्रिल २०१४पासून लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.