शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

...तरच होईल स्मार्ट शहर !

By admin | Updated: July 2, 2015 00:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट शहर’ योजनेत महाराष्ट्रातील १० शहरांची निवड केली जाणार असली तरी याकरिता ३७ शहरांमध्ये स्पर्धा आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, कचरा व्यवस्थापन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट शहर’ योजनेत महाराष्ट्रातील १० शहरांची निवड केली जाणार असली तरी याकरिता ३७ शहरांमध्ये स्पर्धा आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, कचरा व्यवस्थापन या निकषांबरोबरच जे शहर स्मार्ट होण्याकरिता २५० कोटी रुपये उभारू शकेल, त्याचाच या यादीत समावेश केला जाणार आहे.देशातील १०० स्मार्ट शहरांकरिता मोदी सरकारने यंदा ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ३७ शहरांना केंद्र सरकारने निश्चित केलेले निकष पूर्ण करून स्मार्ट शहरांच्या स्पर्धेत सहभागी होण्याचा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे. जुलैअखेरपर्यंत या ३७ शहरांमधून १० शहरांची निवड करून केंद्राला प्रस्ताव सादर करायचा आहे. याकरिता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. महापालिकांचे आयुक्त व नगरसेवक यांनी आपले शहर स्मार्ट शहरांच्या योजनेत सहभागी होण्याबाबत जनमताचा कानोसा घेऊन निर्णय करायचा आहे.स्मार्ट शहराच्या योजनेत सहभागी होणाऱ्या शहरात पुरेसा पाणीपुरवठा, वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. साहजिकच मुंबई, ठाणे यासारख्या शहरांतील वाहतूक समस्या व कचरा व्यवस्थापन हे प्रश्न सोडवण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल तर सोलापूर किंवा तत्सम छोट्या शहरांकरिता पाणीपुरवठ्याची समस्या हे सर्वात मोठे आव्हान असू शकते. प्रत्येक शहरांना त्यांच्यापुढील आव्हानांचा विचार करून स्मार्ट शहर होण्याकरिता कुठल्या बाबींची पूर्तता करावी लागेल ते निश्चित करावे लागेल. (विशेष प्रतिनिधी)केंद्र सरकार प्रत्येक शहराला ५०० कोटींचा निधी मंजूर करणार असून तेवढाच म्हणजे ५०० कोटींचा निधी राज्य सरकारला उभा करायचा आहे. ज्या १० शहरांचा या योजनेत समावेश होईल, त्या प्रत्येक शहराला राज्य सरकार आपल्या तिजोरीतून २५० कोटी रुपये देणार असले तरी त्या शहराला २५० कोटी उभे करून आपला हिस्सा द्यावा लागणार आहे.