शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
3
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
4
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
5
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
6
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
7
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
8
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
9
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
10
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
11
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
12
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
13
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
14
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
15
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
16
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
17
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
18
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
19
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
20
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या

... तरच भारत की जय नारा देऊ : जलील

By admin | Updated: May 16, 2016 01:36 IST

भारत मातेच्या हातात भगवा रंगाचा दिलेला ध्वज काढून तिरंगा द्यावा, तरच आपण भारत की जयचा नारा देऊ

कोल्हापूर : अपात्र महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह सात नगरसेवकांचे जातीचे दाखले अवैध ठरवून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी आज, सोमवारी होणार आहे. तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती निवडीलाही येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने ‘तूर्त मनाई आदेश’ दिला आहे. याबाबतही आजच सुनावणी होणार असल्याने दोन्हीही सुनावणीत स्थगिती मिळणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्हीही पक्षांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला असल्याने कारवाईच्या आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी वकिलांची फौज उभी केली जाणार आहे. महापौरांसह सात जणांच्या जातीच्या दाखल्यास उच्च न्यायालयाने आज, सोमवारी सुनावणीवेळी स्थगिती दिल्यास नव्याने महापौर निवड प्रक्रिया होणार नाही परंतु स्थगिती न मिळाल्यास महापालिका प्रशासनाकडून ही महापौर निवडीची प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे. या निवडीची तारीख निश्चित नसली तरी दि. २६ मे नंतर ही निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठीही येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर मनाई आदेश दिलेला आहे पण याबाबत आज, सोमवारी सुनावणी होणार असल्याने मनाई आदेश कायम होणार की उठविला जाणार हे स्पष्ट होईल. विभागीय जातपडताळणी समितीने महानगरपालिका सभागृहातील अश्विनी रामाणे, वृषाली कदम, संदीप नेजदार, दीपा मगदूम, सचिन पाटील, संतोष गायकवाड, नीलेश देसाई या सात नगरसेवकांचे जातीचे दाखले अवैध ठरविले. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. या कारवाईच्या विरोधात या सातही जणांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जातीच्या दाखले अवैध ठरविण्याच्या कारवाईला स्थगिती मिळविण्यासाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. अपात्र नगरसेवकांनी आपल्या याचिकेत महानगरपालिका, विभागीय जातपडताळणी समिती, राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांना प्रतिवादी केले आहे. अपात्र नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश अधिकतर असल्याने हे अपात्रतेचे राजकीय षङ्यंत्र असल्याचा आरोप करत भाजप व ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्याचा पंचनामा करण्याची खेळी काँग्रेसच्या नेत्यांनी ठरविली आहे. त्यामुळे भाजप-ताराराणीचे दोन नगरसेवकही आता ‘रडार’वर आले आहेत. सभापतिपदाचा मनाई आदेश कायम की उठणार? नवीन सभापती निवडीसाठी उद्या, मंगळवारी महिला बालकल्याण समितीची सभा जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे; पण नवीन सभापती निवडीला काँग्रेस पक्षाचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करून तूर्त मनाई आदेश घेतला. त्यावर आज, सोमवारी महानगरपालिका प्रशासन आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे. त्यावरच मनाई आदेश कायम राहणार की तो उठविला जाणार हे आजच स्पष्ट होणार आहे.