शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

...तरच राज्याचा विकास

By admin | Updated: July 2, 2016 04:17 IST

महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे.

मुंबई : महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासानेच राज्याचा विकास साधता येणार आहे. ही बाब ध्यानात घेऊनच माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीवर लक्ष्य केंद्रीत केले होते, असे मत राज्याचे मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे वसंतराव नाईक यांच्या १०३व्या जयंती दिनानिमित्त प्रतिष्ठेच्या वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोंगिरवार बोलत होते. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण व्हायला हवा, यासाठी वसंतगराव नाईक आग्रही होते. दोन वर्षात तसे झाले नाही तर फाशी घेईन, अशी घोषणाच त्यांनी केली होती. जास्त वाणाचे पीक, हायब्रीड ज्वारी उत्पादनाकडे वसंतरावांनी विशेष लक्ष्य दिले. केवळ संशोधनाच्या माध्यमातूनच प्रगतीशील शेती शक्य आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळ त्यांनी चार कृषी विद्यापीठांची स्थापना केल्याचे बोंगीरवार म्हणाले. (प्रतिनिधी) >यंदाचे विविध विभागांतील वसंतराव नाईक कृषी पुरस्कार विजेतेसामाईक पुरस्कार (उगम फाउंडेशन, कार्यवाह - भाई संपतराव पवार, जि. सांगली); कृषी पुरस्कार ( डॉ. एम.एस. लादानिया. संचालक, केंद्रीय लिबूंवर्गीय संशोधन केंद्र, नागपूर); कृषी प्रक्रीया पुरस्कार (गौण वनऊपज व्यवस्थापन समिती, संचालक उल्हास कुमरे/ विजय मडवी. जि. नांदेड ); कृषी पत्रकारीता पुरस्कार(संतोष काशिनाथ डुकरे, सल्लागार संपादक, कृषीकिंग मासिक आणि अ‍ॅप, जि. पुणे); कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार (विलास हरिभाऊ धुर्जड, जि. नाशिक); फलोत्पादन (उन्मेष लांडे, जि.वाशिम); भाजीपाला उत्पादन (दत्तु ढगे जि. नाशिक) ; फुलशेती उत्पादन पुरस्कार (वृंदावन पुष्पोत्पादन संघ, अध्यक्ष- सुरेश नवसू, जि. पालघर); वनशेती पुरस्कार (परशुराम तानू आगीवाले, जि. रायगड); पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पुरस्कार (इसाक चाऊस, जि. सांगली); जलसंधारण पुरस्कार (लालासाहेब बापूसाहेब देशमुख, जि. लातूर); पर्यावरण संरक्षण पुरस्कार (अल्पाइड एन्व्हायरमेंटल रिसर्च फाऊंडेशन, डॉ. अचर्ना गोडबोले, पुणे)