अकोला : कॉ. गोविंद पानसरे हत्याकाडांतील संशयित आरोपी समीर गायकवाड याला केवळ मोबाइलवरील संभाषणाच्या संशयावरून अटक केली असल्याची माहिती, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी येथे दिली. दोषी आढळल्यास गायकवाडसह इतर दोषींवरही कठोर कारवाई केली जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कॉ. पानसरे हत्याप्रकरणी संशयाची सुई 'सनातन'कडे फिरत असल्याने या संघटनेवर बंदी आणण्याबाबत विचार सुरू आहे काय, असा प्रश्न येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, समीर गायकवाड याला केवळ संशयावरून अटक झाली आहे. मोबाइलवरील संभाषण हा पुरावा होऊ शकत नाही. प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यात दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समीर गायकवाडवर हत्येचा केवळ संशय
By admin | Updated: October 7, 2015 02:08 IST