शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाच जणांच्या मृत्यूस पालिकाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 02:16 IST

महापालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून डेंग्यू व मलेरियाच्या साथीमुळे सामान्य शहरवासीयांना जीव गमवावा लागला आहे.

नवी मुंबई : महापालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून डेंग्यू व मलेरियाच्या साथीमुळे सामान्य शहरवासीयांना जीव गमवावा लागला आहे. तुर्भे नाक्यावर एक महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करून न घेतल्यामुळे एका महिलेचा रिक्षामध्येच मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होवू लागला आहे. डेंग्यूमुळे तुर्भे नाक्यावर पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता ही घटना महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचे निदर्शनास आले आहे. हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या गीता प्रसाद या महिलेला ताप येवू लागल्याने नाक्यावरील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले होते. परंतु ताप कमी होत नसल्याने डॉक्टरने त्यांना रूग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. गीता यांचे पती श्रीचंद यांनी तत्काळ वाशी मनपा रूग्णालयात नेले. पण तेथील डॉक्टरांनी गंभीर काही नसल्याचे कारण देवून रूग्णास घरी घेवून जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशीही प्रकृती खालावल्यामुळे पुन्हा रूग्णालयात नेल्यानंतरही अ‍ॅडमिट करून घेतले नाही. तिसऱ्या दिवशी प्रकृती गंभीर झाल्याने पुन्हा रूग्णालयात घेवून जात असताना रिक्षामध्येच मृत्यू झाला. तुर्र्भे परिसरामधीलच शंकरी हलदार यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. भाऊबीजेच्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. नाक्यावरील सर्व रूग्णालये बंद असल्यामुळे त्यांनी वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयात नेले. परंतु तेथील व्यवस्थापनानेही सुटी असल्याचे कारण देवून त्यांना रूग्णालयात दाखल करून घेतले नाही. परिणामी उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. ध्रुपदा रोहिदास गवळी, पल्लवी गायकवाड व प्रेम भालेकर यांनाही योग्य उपचार मिळाले नसल्यामुळे मृत्यू झाला आहे. शहरात डेंग्यू व मलेरियाने थैमान घातले आहे. नागरिकांचा जीव जात असताना महापालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे तुकाराम मुंढे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना आयुक्तांच्या भीतीने अधिकारी ऐकत नाहीत. या भांडणामध्ये नागरिकांचा जीव जात असल्याने तुर्भे नाका परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)>तुर्भेत आरोग्य सुविधेचा अभावतुर्भे नाका हनुमाननगर, आंबेडकरनगर, गणेशनगर, बोनसरी व इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरात महानगरपालिकेचे एकही नागरी आरोग्य केंद्र नाही. तुर्भे गावात असलेले माता बाल रूग्णालयही काही महिन्यांपूर्वीच बंद झालेले आहे. पालिका रूग्णालयाची सुविधा नाही व खासगी रूग्णालयातील उपचार परवडत नसल्याने झोपडपट्टीतील रूग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. >डेंग्यू व मलेरियाची स्थिती गंभीर आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचा मृत्यू होवू लागला आहे. - अमृत मेढकर, सामाजिक कार्यकर्ते