शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घाईघाईत दिले फक्त पुरवणीचे गुण!, निकालावर नापासचा शेरा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 04:31 IST

मुंबई विद्यापीठाने निकालाच्या दोन डेडलाइन चुकविल्यानंतर निकालाचा धडाका सुरू केला, परंतु निकालाची डेडलाइन पाळण्याची अतिघाई विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरत आहे. घाईघाईत केवळ पुरवणीच तपासल्याने, विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात फक्त पुरवणीचे गुण दिसत आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकालाच्या दोन डेडलाइन चुकविल्यानंतर निकालाचा धडाका सुरू केला, परंतु निकालाची डेडलाइन पाळण्याची अतिघाई विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरत आहे. घाईघाईत केवळ पुरवणीच तपासल्याने, विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात फक्त पुरवणीचे गुण दिसत आहेत. त्यामुळे हुशार विद्यार्थीही नापास झाले असून, त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.आॅगस्ट महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे १०० हून अधिक निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे. त्यातच कुलगुरू डॉ. संजय देशमुख सुट्टीवर गेले आहेत. निकाल कधी लागणार, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतानाच, आता उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासल्या जातील का, हक्काचे गुण तरी मिळतील का, असा नवा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांना एका विषयात कमी गुण म्हणजे, १० ते १५ गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी नापास झाले आहेत. अनेक महाविद्यालयांनी या प्रकरणी विद्यापीठाकडे पत्र पाठवून खंत व्यक्त केल्याचे समजते.विज्ञान शाखेनंतर अन्य निकालांमध्येही सावळागोंधळ आहे. विद्यार्थ्यांना १०० पैकी फक्त १५ ते २० गुणच देण्यात आले आहेत. यापैकी अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे इतके कमी गुण कसे मिळू शकतात? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांनाही पडला आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे विचारणा केली असून, विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत.स्कॅनिंगमुळे गोंधळकाही विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकांची तपासणी झाली आहे, पण पुरवण्या मिळत नसल्याने गोंधळ सुरू आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करताना एक-एक पान वेगळे करण्यात आले. त्यामुळे वेगवेगळ््या प्राध्यापकांकडून ते तपासण्यात आले. त्यामुळेच हा गोंधळ झाला, अशी कबुुली परीक्षा विभागातील एका अधिकाºयांनी दिली.आता तरी डेडलाइन पाळणार का?लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाने स्वत:च १५ आॅगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्याची डेडलाइन दिली आहे. या डेडलाइननुसार, मुंबई विद्यापीठाच्या हातात फक्त ४ दिवस उरले असतानाही शुक्रवारी रात्री साडेआठपर्यंत विद्यापीठापुढे सुमारे पावणेदोन लाखांच्या उत्तरपत्रिकांचा डोंगर आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ दरदिवशी सरासरी १६ ते २० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी करत आहे. त्यामुळे विद्यापीठ स्वत:ची डेडलाइन पाळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी एप्रिल महिन्यात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार मे महिन्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. या निर्णयात मुंबई विद्यापीठ सपशेल नापास झाले आहे.डेडलाइन संपायला शेवटचे चार दिवस उरले आहेत. मात्र उत्तरपत्रिका तपासणीचा वेग जैसे थेच आहे. मुंबई विद्यापीठात शुक्रवारी रात्री साडेआठपर्यंत एकूण १६ हजार २१५ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून, अजूनही १ लाख ७४ हजार ६८२ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. शुक्रवारी, विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणीसाठी फक्त ९६६ प्राध्यापक आले होते. याच वेगाने उत्तरपत्रिका तपासणी सुरू राहिली तर मॉडरेशन कधी आणि निकाल कधी, हा प्रश्न अनुत्तरित आहे. १५ आॅगस्टपूर्वी निकाल जाहीर न झाल्यास निकालाची तिसरी डेडलाइन चुकल्याचा ठपका विद्यापीठावर लागणार आहे.१,८१,५८३ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीमुंबई विद्यापीठात शुक्रवारी एकूण ९ हजार २५९ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले असून ७ हजार २५ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन पूर्ण झाले आहे. १ लाख ८१ हजार ५८३ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. तर, ५९ हजार ६५५ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन बाकी आहे.