शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानजनक तडजोडीनंतरच आघाडी शक्य - मुख्यमंत्री

By admin | Updated: August 4, 2014 03:16 IST

काँग्रेसने महाराष्ट्रात समविचारी पक्षांना सोबत घेऊन पाच वेळा विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत.

नाशिक : काँग्रेसने महाराष्ट्रात समविचारी पक्षांना सोबत घेऊन पाच वेळा विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. युती सरकारच्या कारभारानंतर जनतेने लोकशाही आघाडीवर विश्वास टाकला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. आता सहाव्यांदा आघाडीचा प्रस्ताव आला तर सन्मानजनक तडजोडीसाठी कॉँग्रेस तयार आहे; परंतु कोणत्याही अटी-शर्ती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात बोलताना केले. काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका करीत स्वबळाचा नारा दिला.लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने पराभवाचे विश्लेषण-चिंतन केले. आता विभागीय मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकले आहे. नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे, असे चव्हाण म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावर हुकूमशाही पद्धतीने देशाचा कारभार चालविला जाणार असल्याची भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली. गुजरात मॉडेलच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जाहीर चर्चा होऊन जाऊ द्या, असे आव्हानही त्यांनी दिले. लोकसभा निवडणुकीत अपप्रचारामुळे पक्षाला पराभव पाहावा लागला; परंतु आता वातावरण बदलते आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले. आम्ही एकही जागा सोडणार नाही. सन्मानजनक तडजोडीस तयार आहोत; अन्यथा २८८ जागा लढविण्याची तयारी आहे. काँग्रेसची पहिली यादी लवकरात लवकर जाहीर होणार असून, ११ आॅगस्टपर्यंत इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)