शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अशी कामगिरी केवळ मराठी माणूसच करू शकतो!

By admin | Updated: August 16, 2015 02:16 IST

२५ राज्य, २२३ दिवस आणि १४ हजार किमीचा आव्हानात्मक प्रवास.. ७ जानेवारी २०१५ ला ठाण्यातून सुरुवात केलेल्या सचिन गावकर या अवलिया सायकलिस्टने १५ आॅगस्टला ठाण्यामध्ये

- रोहित नाईक,  मुंबई २५ राज्य, २२३ दिवस आणि १४ हजार किमीचा आव्हानात्मक प्रवास.. ७ जानेवारी २०१५ ला ठाण्यातून सुरुवात केलेल्या सचिन गावकर या अवलिया सायकलिस्टने १५ आॅगस्टला ठाण्यामध्ये परतून सायकलवरुन केलेल्या भारत परिक्रमेची यशस्वी सांगता केली. लडाख येथे भारतीय सेनेच्या जवानांनी ‘ऐसा काम सिर्फ मराठी आदमी ही कर सकता है, व्ही सॅल्युट यू’ अशा शब्दांत केलेले कौतुक खुप अभिमानास्पद असल्याचे सचिनने ‘लोकमत’सह बोलताना सांगितले. अस्थमाचा त्रास असूनही विशेष प्रशिक्षण घेऊन ही मोहिम यशस्वी केल्याने सचिन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.ठाणे येथील इन्स्टिट्यूट आॅफ सायकोलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या संस्थेसह १४ वर्षांपासून काम करणारे ३७ वर्षीय सचिन व्यवसायाने कला क्षेत्रात आहेत. त्यांनी जे. जे. स्कूल आॅफ आर्टमधून शिल्पकलेची पदवी प्राप्त केली आहे. या मोहिमेदरम्यान एकूण ११ वेळा सचिन यांची सायकल पंक्चर झाली. सुमारे साडेतीन हजार किमीचा टप्पा पार केल्यानंतर पहिल्यांदा सायकल पंक्चर झाली. मात्र दरवेळी सचिनने खचून न जाता पंक्चर काढून आपला प्रवास सुरु ठेवला. यासाठी त्याला दरवेळी सायकलवरील ३० किलो वजनाचे सामान उतरवून पुन्हा सायकलवर बसवावे लागायचे आणि पंक्चर काढण्यापेक्षा हेच काम आव्हानात्मक असल्याचे सचिनने सांगितले. या संपुर्ण मोहिमेच्या अनुभवाबाबत सचिन उत्साहाने सांगतो की, या मोहिमेमुळे मला माझा देश कळाला.देशातील इतर भागाविषयी किंवा राज्याविषयी असलेले अज्ञान आणि गैरसमज सगळे दूर झाले. टीव्ही, वर्तमानपत्रांतून किंवा इतर माध्यमांतून जो भारत देश बघतो त्याहून कितीतरीपटीने वेगळा व अद्भुत असा आपला भारत देश आहे. प्रत्येक ठिकाणी आपण भारतीय असल्याची जाणीव होते. भाषा, परंपरा, चालीरीती हे सर्व आपण तयार केलेल्या मर्यादा किंवा बॉर्डर आहेत. पण या मोहिमेतून मी खरे भारतीयत्व अनुभवले.ज्या मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी ही मोहिम आखली होती त्याबाबत सचिन म्हणाला की, प्रत्येक राज्यामध्ये मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लोकांना माहिती घेण्यामध्ये खुप उत्सुकता होती. या मोहिमेद्वारे मानसिक आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करण्यात यशस्वी ठरलो हेच महत्त्वाचे ठरले. देशभरातील लोकांना असलेल्या समस्या कळाल्या, विविध माहिती मिळाली. आता माझ्यावरील जबाबदारी वाढली असून आयपीएच संस्थेसोबत पुढील कार्य करण्याचे नेवे आव्हान माझ्यापुढे आहे.प्रवास सचिनचा...महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, प. बंगाल, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा , दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात.आता मिशन ‘वर्ल्ड’ । सायकलवरुन भारत परीक्रमा केल्यानंतर आता पुढची मोहिम काय असे विचारले असता सचिनने आंतरराष्ट्रीय मोहिमेच्या विचारात असल्याचे सांगितले. २०१८ साली वयाची ४० वर्ष पूर्ण करणार असून किमान ४० देश तरी सायकलवरुन फिरण्याचा प्रयत्न करणार असे सचिन म्हणाला.सायकल ‘स्टेट्स सिम्बॉल’। मी ज्या-ज्या ठिकाणी गेलो तेथे सायकलवरुन आल्याने मला खुप सम्मान मिळाला. हा सायकलला मिळालेला सम्मान होता. आज तरुणाई बाईकच्या मागे आहे. त्यात वाईट काहीच नाही. मात्र सायकलला विसरता कामा नये. ज्यावेळी तरुणाईला महागड्या सायकलचे स्वप्न पडेल तेव्हा सायकल स्टेटस सिम्बॉल बनेल, असे सचिनने सांगितले.या मोहिमेसाठी सचिन जेव्हा निघाला होता तेव्हा काळजी म्हणून डोळ्यांत पाणी होते. आज तो परतला तेव्हा देखील डोळ्यांत पाणी होते पण ते आनंदाश्रू होते. त्याच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. तो रोज आमच्या संपर्कात होता. त्याची भेट कधी होते याची उत्सुकता होती. - पल्लवी गावकर (सचिनची बहीण)ठाणेकर असल्याचा अभिमानया मोहिमेमध्ये सुरुवातीला मी मुंबईहून आलो असल्याचे सांगायचो. मात्र नंतर ठाण्याहून आल्याचे सांगितले. तेव्हा लोकांना पोलिस ठाणे वाटायचे. मात्र ठाणे नावाचे शहर मुंबई नजीक असल्याचे सांगितल्यावर लोकांना आश्चर्य वाटले. या मोहिमेतून ठाणे जिल्हा, शहरचे नाव देशभरामध्ये पोहचवू शकलो याचा अभिमान आहे.- सचिन गावकर