शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

केवळ विसंगत विचारशक्तीमुळे साताऱ्यातील योजना राखीव

By admin | Updated: February 23, 2015 00:20 IST

उदयनराजे भोसले : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत डागली ‘हेकेखोरवृत्ती’वर तोफ

सातारा : ‘विविध आघाड्यांचे अस्थिर सरकार असले की विकासकामांची गरज असो अथवा नसो, एखाद्याच्या अट्टाहास किंवा हेकेखोरवृत्ती यामधून सरकारी निधीचे असमान पद्धतीने वितरण होत आहे. असे सामान्य व्यक्तींचे मत बनले आहे. त्यातुनच सातारा जिल्ह्यातील विविध विकास योजना मार्गी लावण्यापेक्षा, त्या राखीव ठेवण्याचाच प्रयत्न झाल्याचे दिसते. अशा विसंगत विचारशक्तींमुळे राज्याचे एक-दोन नव्हे तर तब्बल ७१ प्रश्नांचे विषय केंद्राकडे प्रलंबित आहेत,’ असे परखड मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलविली होती. या बैठकीत सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना खासदार उदयनराजे बोलत होते.सातारा जिल्ह्याचे प्रश्न, राज्याने केंद्राकडे पाठविले पाहिजेत, असे नमूद करून, रेल्वेचे प्रश्न मांडताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, प्रस्तावित दिल्ली, मुंबई, बेंगलोर इंडस्ट्रियल कॅरिडॉर सातारा जिल्ह्यातून जात आहे. रेल्वे मार्ग हा व्यापार दळणवळणाची अर्थवाहिनी समजली जाते. याचा कोकणभूमीला लाभ मिळण्यासाठी, कोकण भूमी पश्चिम महाराष्ट्राला कऱ्हाड-चिपळूण या १११ किलोमीटर नवीन रेल्वेमार्गाने जोडणे गरजेचे आहे. या कामाचा ९२० कोटींचा प्रस्ताव २०१० पासून केंद्रीय रेल्वे बोर्डकडे प्रलंबित आहे. तसेच राज्य शासनानेही या मार्गाचा ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. कोकण रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे यांच्या संयुक्त माध्यमातून सर्वात किफायतशीर आणि अन्य ठिकाणच्या मार्गापेक्षा सर्वात सुलभ असलेला हा रेल्वे मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरिता झाला पाहिजे.सातारा स्टेशनवर दररोज सुमारे ७० रेल्वेगाड्यांची ये-जा असते; परंतु सध्या सिंगल ट्रॅक अस्तित्वात असल्याने, जादा रेल्वेगाड्या सुरू करण्याला मर्यादा पडत आहेत. तसेच क्रॉसिंग दरम्यान वेळेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे रेल्वेचा पुणे ते कोल्हापूर, मिरज असा डबल ट्रॅक निर्माण करण्याबाबत जलद कार्यवाही होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)खंबाटकी घाटात नवीन बोगदा करा...नॅशनल हायवे आॅथॅरिटी आॅफ इंडियाने खंबाटकी घाट येथे नवीन बोगद्याचा विषय तत्वत: मंजूर केला असून सर्व्हे झाला आहे. इंडस्ट्रियल कॅरिडॉरसाठी येथे नवीन बोगदा उभारून रस्ता सहापदरीकरण करावा. शेंद्रे ते कागल या सुमारे १३४ किलोमीटर अंतराचे सहापदरीकरणाचे काम सुरू करण्याबाबत राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असेही उदयनराजे यांनी सांगितले.