शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

ध्यास व पेशा एकच असेल तरच सर्वोच्च यश आवाक्यात

By admin | Updated: October 11, 2015 02:27 IST

तुमचा ध्यास हाच तुमचा पेशा असेल तरच तुम्ही त्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थानी विराजमान होऊ शकता. स्वत:ला कामात पूर्ण झोकून दिल्यास कामाचाही आनंद उपभोगता येतो, असा यशस्वी

मुंबई : तुमचा ध्यास हाच तुमचा पेशा असेल तरच तुम्ही त्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थानी विराजमान होऊ शकता. स्वत:ला कामात पूर्ण झोकून दिल्यास कामाचाही आनंद उपभोगता येतो, असा यशस्वी जगण्याचा मूलमंत्र ब्रिगेडीयर सुशील बसीन यांनी शनिवारी राष्ट्रीय आॅनलाइन निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात उपस्थित शाळकरी विद्यार्थ्यांना दिला. यलो टॉक या संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी १० ते ३० सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली होती. ‘पॉवर आॅफ अनकन्व्हेंन्शनल थिंकिंग- द माइंड दॅट ब्रॅन्चेस आऊट’ या विषयावर देशभरातील विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन पद्धतीने निबंध मागवण्यात आले होते. माटुंगा येथील म्हैसूर असोसिएशनच्या सभागृहात उत्साही वातावरणात त्याचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. त्यात ब्रिगेडीयर बसिन म्हणाले, ध्येय आणि आपली ऊर्जा यांची सांगड घालता आली तरच आयुष्यात यशस्वी होता येते. आर्यमन दर्डाची छापदेशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेली आॅनलाइन निबंध स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. त्यात आठवी ते दहावी या (गु्रप-२) या गटात आर्यमन देवेंद्र दर्डा याने विजेतेपद मिळविले. आर्यमन हा येथील एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना एकूण ५ बक्षिसे मिळाली आहेत. स्पर्धेतील तिन्ही गटांत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचा गटवार निकालअनुक्रमे पहिले पाच विजेते व शाळेचे नावगट - १ (पाचवी ते सातवी) : जयती नागोरी - (चिल्ड्रन्स अ‍ॅकॅडमी, मुंबई ), श्रेया पटेल - (चिल्ड्रन्स अ‍ॅकॅडमी, मुंबई), श्रेया टंडन - (एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, मुंबई), सिद्धान्त शर्मा - (एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, मुंबई), निहीरा नामजोशी - ठाकूर इंटरनॅशनल स्कूल (सीआयई), मुंबई) गट - २ (आठवी ते दहावी) : आर्यमन देवेंद्र दर्डा - (एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, मुंबई), समीक्षा पुरी - (डीएव्ही पब्लिक स्कूल, नवी दिल्ली), अनन्या सक्सेना - (चिल्ड्रन्स अ‍ॅकॅडमी, मुंबई), वंशिका झवेरी - (सेंट जॉर्ज हायस्कूल, मुंबई), शोबित सिंग - (जीया लाल मित्तल डीएव्ही पब्लिक स्कूल, गुरुदासपूर)गट -३ (अकरावी ते बारावी) : रोहित के.आर. - (एस.बी.ओ. ए स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, चेन्नई), रौल गुलरजानी - (एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, मुंबई), सुयोग बुभाटे- (एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, मुंबई), ज्योती शर्मा - (केडीव्ही पब्लिक स्कूल, गाझियाबाद), बद्री नारायणन - (शिक्षा केंद्र स्कूल, वेल्लोरी)मान्यवरांची उपस्थितीब्रिगेडियर बसीन यांच्यासह विविध मान्यवरांनी यशस्वीतेचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. सामाजिक कार्यकर्त्या इंद्राणी मलकानी, प्रोफेसर नागार्जुन, विनायक देशपांडे, डॉ. शंकर दास, मिरियन मेनाचेरी, अखिल आर्यन, विवेक शुक्ला हे नामवंत वक्ते तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने सोहळ्यास उपस्थित होते.