शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीचा नुसताच फार्स

By admin | Updated: August 4, 2014 03:31 IST

गणेशोत्सवानिमित्त आॅगस्ट अखेरीस कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल झाले

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त आॅगस्ट अखेरीस कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल झाले आणि एकच धक्का बसला. यात काही घोटाळा झाल्याची ओरड झाल्यावर चौकशी करण्यासाठी थेट रेल्वेमंत्र्यांकडून रेल्वे बोर्डाचे अतिरिक्त सदस्य (वाहतूक) अमिताभ लाल यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र चौकशी प्रमुख असलेले अमिताभ लाल जुलै महिन्यातच निवृत्त झाले असून, ही चौकशी थांबली असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. फक्त कोकणवासीयांसाठी हा चौकशीचा फार्स दाखवण्यात आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सवास सुरुवात होत असून, कोकण आणि त्यामार्गे जाणाऱ्या नियमित ट्रेनचे आरक्षण जून महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात आले. मात्र आरक्षण सुरू होताच दुसऱ्या मिनिटाला ट्रेन फुल्ल झाल्या आणि वेटिंग लिस्टचा सामना गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना करावा लागला. कोकणकन्या ट्रेन तर अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाल्याने प्रवाशांनी मोठा गोंधळच केला. त्यामुळे यामागे तिकीट दलाल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची साखळीच असल्याचा अंदाज लावला गेला. मात्र रेल्वे प्रशासनाने हा अंदाज धुडकावून लावत कुठलाही घोटाळा नसल्याचे स्पष्ट केले. तर भाजपाच्या नेत्यांनी थेट रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे धाव घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. रेल्वेमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि चौकशीसाठी रेल्वे बोर्डाचे अतिरिक्त सदस्य (वाहतूक) अमिताभ लाल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची शहानिशा होईल, अशी आशा कोकणवासीयांना होती. मात्र आॅगस्ट महिना उजाडला तरी चौकशी समितीतून अजूनही काहीच निष्पन्न झाले नाही. तसेच एका महिन्यात या समितीकडून माहिती दिली जाणार असतानाही तशी माहितीही समोर आलेली नाही. या चौकशी समितीचे एकमेव प्रमुख असलेले अमिताभ लाल हे जुलै महिन्यातच निवृत्त झाल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी थांबलेली आहे. (प्रतिनिधी)