शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या पाच दिवसाचा स्वराज पॅनकार्डधारक!

By admin | Updated: March 1, 2017 00:24 IST

महाराष्ट्रातील लहान पॅनधारक : कोल्हापुरातील अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

गणेश शिंदे -- कोेल्हापूर  कोल्हापुरातील शुक्रवार पेठ, पिवळा वाडाजवळील अमोलदादा शिशुपाल पाटील (रा. १८२१ डी, वॉर्ड) यांनी त्यांच्या अवघ्या पाच दिवसांच्या नवजात बालकाचे पॅनकार्ड काढले आहे. हे पॅनकार्ड त्यांना आयकर विभागाकडून प्राप्त झाले आहे. स्वराज अमोलदादा पाटील असे या नवजात बालकाचे नाव आहे. यापूर्वी बिहार येथील एका बालिकेचे पॅनकार्ड पाचव्या दिवशी काढले होते. त्यानंतर भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले कमीत कमी वयाचे हे पॅनकार्ड ठरले आहे. अमोलदादा पाटील हे कर सल्लागार आहेत. ९ जानेवारी २०१७ रोजी पाटील यांच्या पत्नीने रायबाग (जि. बेळगाव) येथील एका खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. त्यांनी त्याच्या जन्मानंतर चौथ्या दिवशी खानापूर तहसीलदार कार्यालयातून स्वराज अमोलदादा पाटील नावाचा दाखला काढला व पाचव्या दिवशी स्वराजचा जन्मदाखला, त्याचे दोन आयकार्ड फोटो, आपले आधारकार्ड व पॅनकार्ड अशी कागदपत्रे प्राप्तिकर विभागात दिली. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०१७ रोजी स्वराजचे पॅनकार्ड त्यांच्या घरी पोस्टाने आले. आयकर भरण्यासाठी, एलआयसी, पासपोर्ट व ओळखीचा पुराव्यासाठी पॅनकार्डचा उपयोग होतो.केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी केल्यानंतर बॅँक अथवा कोणत्याही शासकीय कार्यालयात पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. या पॅनकार्डमुळे सरकारला देशातील कोणत्या व्यक्तीचे उत्पन्न किती आहे, हे समजू शकणार आहे. त्यामुळे आधारकार्डबरोबर पॅनकार्डही सरकारने सक्तीचे केले आहे. याबाबत अमोलदादा पाटील म्हणाले, केंद्र सरकारने पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे जन्मानंतर मुलाचे पॅनकार्ड तत्काळ काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार देशभरात किती बालकांची पॅनकार्ड काढली आहेत, याची माहिती घेतली. त्यावेळी बिहारमधील एका बालिकेचे पाचव्या दिवशी पॅनकार्ड काढल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मला मुलगा झाल्यावर पाचव्या दिवशी त्याचे पॅनकार्ड काढले. असे महाराष्ट्रातील हे पहिलेच पॅनकार्ड ठरले. पॅनकार्ड काढल्यामुळे मुलाच्या नावे आतापासून नियोजनपूर्वक गुंतवणूक करता येते व त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला व पाल्याला होतो. तसेच करबचतही करता येते.- अमोलदादा पाटील, कोल्हापूर.