शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ निराधार महिलाच पतीकडून पोटगी मागू शकतात

By admin | Updated: June 22, 2017 05:34 IST

स्वत:चा खर्च उचलू न शकणारी निराधार महिलाच फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) कलम १२५ अंतर्गत पतीकडे पोटगी मागू शकते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने नुकताच दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वत:चा खर्च उचलू न शकणारी निराधार महिलाच फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) कलम १२५ अंतर्गत पतीकडे पोटगी मागू शकते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने नुकताच दिला. आॅक्टोबर २०१४ मध्ये सिंधुदुर्ग दंडाधिकाऱ्यांनी दरमहा आठ हजार रुपये कमावणाऱ्या महिलेला पोटगी म्हणून दरमहा दीड हजार रुपये देण्याचा आदेश तिच्या पतीला दिला. पतीने या आदेशाला सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात आव्हान दिले. परंतु, सत्र न्यायालयानेही दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे उच्च न्यायालयात पतीने धाव घेतली. स्वत:चा खर्च उचलू न शकणाऱ्या निराधार महिलेला पोटगी देण्याचा आदेश न्यायालय देऊ शकते, हे सीआरपीसी कलम १२५ वाचल्यानंतर लगेच स्पष्ट होते,’ असे न्या. के. के. तातेड यांनी म्हटले.जून २००७मध्ये विवाह झालेल्या दाम्पत्याचा संसार केवळ १५ दिवस टिकला. विवाह झाल्यानंतर १५ दिवसांनी पत्नीने तिचा गाशा गुंडाळत माहेर गाठले. त्यानंतर पतीने लगेचच घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज केला. पत्नीतर्फे बाजू मांडायला कोणीच उपस्थित न राहिल्याने कुटुंब न्यायालयाने जानेवारी २०१०मध्ये एकतर्फी आदेश देत पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. आॅगस्ट २०१०मध्ये पतीने दुसरा विवाह केला. जून २०१२मध्ये संबंधित महिलेने पोटगी मिळावी यासाठी सीआरपीसी कलम १२५ अंतर्गत सिंधुदुर्ग दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. आॅक्टोबर २०१४ मध्ये दंडाधिकाऱ्यांनी महिलेच्या बाजूने निर्णय देत तिला दरमहा दीड हजार रुपये देण्याचा आदेश दिला. याविरुद्ध पतीने सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र तेथेही पतीला दिलासा मिळाला नाही.