शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

नवी मुंबई राज्यातील एकमेव स्वच्छ शहर

By admin | Updated: August 9, 2015 00:43 IST

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत दोन वेळा राज्य सरकारचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नवी मुंबई : संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत दोन वेळा राज्य सरकारचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशातील शंभर शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तर स्वच्छतेच्या यादीतील हे राज्यातील एकमेव शहर ठरले आहे.केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने स्वच्छ भारत मोहिमेला मिळालेल्या यशाची चाचपणी करण्यासाठी देशातील ४७६ शहरांची पाहणी केली. या पाहणीनंतर टॉप १०० शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नवी मुंबई हे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर या यादीत समाविष्ट झालेले महाराष्ट्रातील हे एकमेव शहर ठरले आहे. त्यामुळे येथील नागरी सोयी-सुविधांचा दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. प्रशस्त रस्ते, घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी अत्याधुनिक यंत्रणा, दैनंदिन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने हाताळणी, चोवीस तास पाणीपुरवठा आदी सुविधांची देशपातळीवर वारंवार दखल घेतली गेली आहे. इतकेच नव्हे, तर आतापर्यंत विविध पुरस्काराने महापालिकेचा सन्मान करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवीमुंबई महापालिकेला सन्मान प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे अलीकडेच राज्य सरकारच्या स्मार्ट सिटी उपक्रमासाठी निवडक १० शहरांमध्ये नवी मुंबईची निवड झाली आहे. त्यापाठोपाठ आता स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरे व महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईला बहुमान प्राप्त झाला आहे. देशातील १०० टॉप स्वच्छ शहरांची निवड करताना केंद्रीय विकास मंत्रालयाने सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक सेवा तसेच तेथील स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्याचे व्यवस्थापन, सरकारी इमारती व परिसराची स्वच्छता आदींची पाहणी केली. त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीतील शहरांची क्रमवारी निश्चित करण्यात आली. या सर्व निकषात नवी मुंबई महापालिकेने बाजी मारली. दरम्यान, देशातील तिसऱ्या व राज्यातील पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईला बहुमान प्राप्त झाला आहे. समस्त नवी मुंबईकरांसाठी ही बाब अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)अव्वल ठरलेली दहा शहरेस्वच्छतेच्या बाबतीत म्हैसूर (कर्नाटक), तिरुचिरापल्ली (तामिळनाडू), नवी मुंबई (महाराष्ट्र), कोची (केरळ), हसन (कर्नाटक), मंड्या (कर्नाटक), बेंगळुरू (कर्नाटक), तिरुअनंतपुरम (केरळ), हलीसाहर (पश्चिम बंगाल) आणि गंगटोक (सिक्कीम) ही दहा शहरे देशात अव्वल ठरली आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीत बेंगळुरूने शहरांच्या राजधानी गटात तर म्हैसूरने अन्य शहरांच्या गटात अव्वल स्थान पटकाविले आहे. पश्चिम बंगालच्या २५ शहरांनी या टॉप १०० मध्ये स्थान मिळविले आहे. महाराष्ट्रातून नवी मुंबई हे एकमेव शहर या यादीत समाविष्ट झाले आहे.