शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात फक्त ५४ टक्के सातबारांचेच डिजिटायझेशन

By admin | Updated: February 3, 2017 01:58 IST

महाराष्ट्रात फक्त ५४ टक्के सातबारांचेच डिजिटलीकरण करणे आतापर्यंत शक्य झाले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली.

मुंबई : महाराष्ट्रात फक्त ५४ टक्के सातबारांचेच डिजिटलीकरण करणे आतापर्यंत शक्य झाले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व सातबारांचे डिजिटलीकरण केले जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबरमध्ये केली होती. तथापि, या कामाची सध्याची गती पाहता घोषणेप्रमाणे मार्चअखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अशक्य आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या कामात अनेक अडथळे आहेत. निकृष्ट इंटरनेट उपलब्धता, कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि पायाभूत सोयींचा अभाव यांचा त्यात समावेश आहे. डिजिटलीकरण मोहिमेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण इतर घटक या कामाच्या प्रगतीवर परिणाम करीत आहेत. सातबारा हा शेतीच्या मालकीचा दस्तावेज आहे. कर्ज करार, पीक सर्वेक्षण आणि सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी सातबाराचा वापर प्रामुख्याने केला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत हातांनी लिहिलेला सातबारा तलाठ्यांकडून शेतकऱ्यांना मिळत होता. सातबारात फेरबदल करण्याचा अधिकार फक्त तलाठ्यांनाच आहे. त्याचा फायदा घेऊन तलाठ्यांनी अनेक घोळ केल्याचे प्रकारही घडत आले आहेत. या घटना टाळण्यासाठी सरकारने सातबारांचे संपूर्ण डिजिटलीकरण करण्याची योजना आणली आहे. दस्तावेजात छेडछाड टाळणे हाही एक उद्देश त्यामागे आहे. प्राप्त माहितीनुसार, डिजिटलीकरणाला गती देण्यासाठी अनेक तरतुदी सरकारकडून करण्यात आल्या आहेत. आॅप्टिकल फायबरचे नेटवर्क उभारणे, उच्च गतीचे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून देणे आणि तलाठ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देणे, याचा त्यात समावेश आहे. ठरवून दिलेल्या कायमर्यादेत हे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार नाही. तथापि, आम्ही ते नक्की गाठू, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.