शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

ठाणेकरांसाठी फक्त ५ फायलेरिया निरीक्षक

By admin | Updated: December 4, 2014 02:45 IST

राज्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या थैमानाच्या रुग्ण आकडेवारीने एकीकडे आरोग्य प्रशासनाला घाम फोडला असताना,

अजय महाडिक, मुंबईराज्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या थैमानाच्या रुग्ण आकडेवारीने एकीकडे आरोग्य प्रशासनाला घाम फोडला असताना, या आजारांचा फैलाव प्रतिबंधित कारणाऱ्या फायलेरिया विभागाच्या भरतीचे घोंगडे ठाणे महानगरपालिकेने १९९१पासून भिजत ठेवले आहे. २०११च्या जनगणनेनुसार १८ लाख १८ हजार ८७२ लोकसंख्येच्या या शहरात डेंग्यू रोखण्यासाठी फक्त २३५ कर्मचारी कागदावर दिसतात. ५० हजार नागरिकांमागे १ फायलेरिया निरीक्षक असे स्पष्ट शासकीय धोरण असतानाही त्याकडे पाठ फिरवण्यात आली आहे. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या विभागाकडे अद्याप स्वतंत्र अर्थसंकल्प नसून कायम कर्मचाऱ्यांचे पगार वगळता वारंवार आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अर्थसंकल्पातून हा खर्च भागवण्यात येतो, हे विशेष!ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात मलेरिया व डेंग्यू नियंत्रणासाठी वेगळा कर्मचारीवर्ग नेमणे व त्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असणे याबाबत वारंवार विभागीय स्तरावर मागणी होत आहे. तत्कालीन आयुक्त नंदकुमार जंत्रे यांच्या कारकिर्दीत फायलेरिया विभागात अत्यावश्यक म्हणून २६९ रिक्त पदांच्या भरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र सदर भरती प्रस्ताव ‘अनावश्यक’ या शेऱ्यासह परत पाठविण्यात आला. सध्या या प्रस्तावाची फाईल आस्थापना विभागात पडून आहे.शासनाच्या धोरणानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या फायलेरिया विभागात २३५ कर्मचारी वगळता २६९ पदे भरणे आवश्यक असल्याचा ताळेबंद आस्थापना विभागाकडे आहे. यात ३१ फायलेरिया निरीक्षक, ३६ वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, २८ कीटक समाहक, १७४ क्षेत्र कार्यकर्ता या पदांचा अंतर्भाव आहे. या सर्व पदांवर नेमणूक झाल्यास महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाला २,५२,७९,५०० रुपये (कोटी) एवढा बोजा अपेक्षित आहे. १८ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा गावगाडा हाकताना महापालिकेच्या फायलेरिया विभागाला वर्ष २०१२पर्यंत दरवर्षी कंत्राटी कामगार घ्यावे लागत होते. त्यानंतर आवश्यकता म्हणून ५० सफाई कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे, मात्र फायलेरिया विभागातीलच काही कर्मचारी इतर विभागांत वळते केल्याचेही वास्तव आहे.