शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभराच्या पेयजलाची सोय अवघ्या १५ दिवसांत

By admin | Updated: April 29, 2016 03:15 IST

वसईतील पाली गावातील फेलिक्स मच्याडो (८५ वर्षे) यांच्या बोअरिंगला १८ वर्षांपूर्वी खारे पाणी लागले.

शशी करपे,

वसई- वसईतील पाली गावातील फेलिक्स मच्याडो (८५ वर्षे) यांच्या बोअरिंगला १८ वर्षांपूर्वी खारे पाणी लागले. पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नव्हती. त्यांनी एक भन्नाट कल्पना लढवली. पावसाचे पाणी मोठ्या टँकमध्ये भरले आणि वर्षभर पिण्यासाठी त्याच पाण्याचा वापर केला. तेव्हापासून मच्याडो कुटुंबीय पावसाचेच पाणी पिऊन तहान भागवत आहेत. यंदा आॅगस्टपर्यंत पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा त्यांच्या घरात आहे. पाली गाव खाडीपासून जवळ असल्याने विहिरी आणि बोअरिंगला खारे पाणी येते. त्यामुळे पाणीटंचाई नेहमीच भेडसावते. फेलिक्स यांनी पावसाचे पाणी साठवले आणि त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला. बंगल्याच्या कौलावर पडणारे पावसाचे पाणी पाइपद्वारे खाली आणून कॉटनच्या कपड्याने गाळून अंगणातील मोठ्या टाक्यांमध्ये जमा केले जाते. त्यानंतर टाक्या सील करून सावलीत ठेवण्यात येतात. अवघ्या दहा-पंधरा दिवसांत वर्षभर पुरेल इतका आठ ते दहा हजार लीटर पिण्याच्या पाण्याचा साठा होतो. मग वर्षभर हेच पाणी उकळून पिण्यासाठी वापरले जाते. >१०-१५ दिवसांची मेहनतपाणी भरण्यासाठी फक्त १०-१५ दिवस थोडी मेहनत घ्यावी लागते. पावसाळा सुुरू झाला की पहिल्या १५-२० दिवसांत कौले साफ होतात. त्यानंतर पाणी साठवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. मुसळधार पाऊस पडेल तेव्हाच पाणी साठवण्याचे काम केले जाते. मग, कधी कधी त्यासाठी रात्र जागवावी लागते. >मच्याडो यांची खंत ही योजना यशस्वीपणे राबवली जात असली तरी त्याचे कुणीही अनुकरण करायला तयार नाही. अनेक नातेवाइकांना पटवून देऊनही कुणी रस दाखवला नाही, अशी खंत मच्याडो यांनी व्यक्त केली. आमच्या घरच्यांना मात्र या पाण्याशिवाय दुसरे पाणी गोड लागत नाही, असेही मच्याडो सांगतात.