शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

लग्न ठरविण्याचा आॅनलाईन ट्रेंड

By admin | Updated: October 24, 2014 00:16 IST

संकेतस्थळावर हिट्स वाढल्या : योग्य उमेदवारासाठी आॅनलाईन नावनोंदणीकडे कल

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -पूर्वी वधू पाहण्याचे काम चैत्र-वैशाख या दोन महिन्यांत धूमधडाक्यात चालायचे. आता परिस्थिती बदललीय. वधू-वर सूचक केंद्रे सुरू झाली आहेत. या ठिकाणी वधू-वरांचे फोटो, आदी माहिती उपलब्ध होऊ लागली. आता संकेतस्थळावरून अल्पवेळेत घरबसल्या योग्य वधू-वरांसंबंधी माहिती मिळत असल्याने अनेक संस्थांसह विविध समाजांतील संघटनांचा या वधू-वर संकेतस्थळाकडे पाहण्याचा कल वाढत आहे. मुलगा किंवा मुलगी लग्नाची झाली की, अमक्याचा मुलगा-मुलगी लग्नाची झाली की कोणी तरी वधू-वर सूचक केंद्रात जाण्यासाठी सुचवतं. पालकांचं वेगळंच म्हणणं असतं. आम्ही बघू तो मुलगा, हिला पसंत पडत नाही. मुलाला नक्की कशी मुलगी हवीय, त्याचाच पत्ता लागत नाही. सुंदर, देखणी मुलगी आणली तरी नाकारतो. हेच सूर प्रत्येक घरात ऐकायला मिळतात; परंतु आता पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या निवडीचा मेळ साधता येईल, यासाठी अनेक संस्थांनी, तसेच समाज-संघटनांनी वधू-वर सूचक केंद्रे सुरू केली आहेत. त्यांच्यावतीने वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्यांचे आयोजन केले जाते. मात्र, परगावांतील लोकांना या ठिकाणी येणे शक्य नसते. त्यामुळे त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ‘आॅनलाईन’ मनं जुळविण्यासाठी संकेतस्थळे सुरू करण्यात आली आहेत. यापूर्वी वधू-वर सूचक मंडळेच फक्त संकेतस्थळे काढत होती. आता मात्र विविध समाजांतील वधू-वर सूचक मंडळांच्यावतीने ही संकेतस्थळे सुरू केली आहेत. या संकेतस्थळांवर नोंदणी करण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. अशी असते माहिती याठिकाणी वधू-वरांचे फोटो, जन्मठिकाण, वय, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, गोत्र, पाहुणे मंडळींची नावे, अपेक्षित वधू-वरांची माहिती दिलेली असते. काही संकेतस्थळे मोफत, तर काही शुल्क आकारतात.आजच्या धावपळीच्या युगात मुलगा-मुलगी घरी जाऊन पाहणे, हे कालबाह्य होत आहे. त्यामुळे लोकांची गरज ओळखून आम्ही लवकरच वधू-वर केंद्राचे संकेतस्थळ सुरू करीत आहोत. त्यामुळे समाजातील मुला-मुलींना घरबसल्या त्यांच्या पसंतीचे वधू-वर निश्चित करता येणार आहेत. - शांताराम पन्हाळकर, संचालक, चर्मकार समाज वधू-वर सूचक मंडळ