शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन खंडणी, भारताला मोठा धोका

By admin | Updated: June 5, 2016 16:32 IST

आता मात्र या टेक्नो काळात गुन्हा करण्याची पद्धत आणि गुन्हेगार दोन्ही बदललेत.

अनिल भापकर

अपहरणकर्त्यांनी घरातील एखाद्या सदस्याचे अपहरण करून अमुक इतक्या मोठ्या रकमेची मागणी केली. पैसे मिळाले नाही तर अपह्रत व्यक्तीला ठार मारण्याची धमकी मिळाली. शिवाय पोलिसांना कळविल्यास अपह्रत व्यक्तीला ठार मारण्याची धमकी अशा तऱ्हेच्या बातम्या सर्रास वर्तमानपत्रात पूर्वीपासून वाचायला मिळतात. आता मात्र या टेक्नो काळात गुन्हा करण्याची पद्धत आणि गुन्हेगार दोन्ही बदललेत.एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो की तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून, तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शनला क्लिक करून अमुक इतकी रक्कम ह्या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासांत जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलीट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काऊंटडाऊनसुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा ह्या हॅकर्सने घेतलेला असतो. या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही. या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. यामध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत . विशेष म्हणजे असे गुन्हे उघडकीस आलेल्या देशांच्या यादीत भारताचा पाचवा क्रमांक लागतो. म्हणजे रॅन्समवेअर ह्या सायबर गुन्हेगारीचा भारताला फार मोठा धोका आहे.  जगाच्या कुठल्या तरी कानाकोपर्‍यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ह्यसायबर भामटेह्ण करायला लागले.तुमचा सगळा डेटा एका क्षणात नष्ट झाला किंवा त्याची चोरी झाली तर कोणाचंही धाबं दणाणणं साहजिकच आहे.

काय काळजी घ्यावी ?

१. सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच अ‍ॅण्टीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे.२.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापांना बळी पडून चुकीच्या वेबसाईटला भेट देऊ नका .३. संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते . ४. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटाच्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .

स्मार्टफोनला ही धोका

संगणकांप्रमाणे स्मार्टफोनला ही हॅकिंगचा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती ह्या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात. त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे एप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या . शक्यतो गुगल प्ले वरून एप इन्स्टाल करा . कुठलीही ए पी के फ़ाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टाल करू नका