शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाइन’ मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 04:59 IST

एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी तिकीट सुविधांमध्ये नवीन बदल केले जात असले तरी ते प्रवाशांच्या ‘पथ्यावरच’ पडत असल्याचे दिसते.

मुंबई : एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी तिकीट सुविधांमध्ये नवीन बदल केले जात असले तरी ते प्रवाशांच्या ‘पथ्यावरच’ पडत असल्याचे दिसते. परंतु याचे एसटी महामंडळाला सोयरसुतकच नाही. एसटीच्या आॅनलाईन तिकीट सेवेतून प्रवाशांकडून तिकीटे काढण्यात येतात. परंतु बहुतांश वेळी तिकीटांचे पैस अदा होतात. मात्र तिकीट निघत नसल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पुन्हा एसटी स्थानकाची वाट धरावी लागते. अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने कॅशलेसकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. तिकीट खिडकयांवर एसटीकडून स्वाईप मशिन उपलब्ध करण्यात आले आहे. डेबिट कार्ड स्वाईप करताच तिकीटाचे पैसे त्यातून अदा केले जातील आणि तिकीट उपलब्ध करण्यात येईल. ही सेवा देण्यात आली असली तरी त्याआधी प्रवाशांसाठी आॅनलाईन काही वर्षापूर्वी तिकीट सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे घरबसल्या प्रवासी तिकीट काढू शकतात. प्रवाशांकडून एसटी बसचा मार्ग आणि त्यानंतर आसन व्यवस्था आॅनलाईन आरक्षित केल्यानंतर डेबिट कार्डव्दारे पैसे अदा करतात. पैसे अदा करताच तिकीटाची रक्कम कापून जाते. परंतु तिकीट निघाल्याचा मॅसेज प्रवाशांना एसटीकडून येत नाही. तसेच ते आसनही ‘ब्लॉक’होऊन जाते. प्रवाशांना तिकीट निघाले की नाही याची माहितीही समजत नाही. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना स्थानकाकडे घेत प्रवाशांना पुन्हा तेच आसन आणि बस मार्ग मिळवण्यासाठी पैसे अदा करावे लागतात. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, आॅनलाईन व्यवहारासाठी एसटीने एका बँकेसोबत करार केला असून त्या बँकेच्या सर्व्हरमध्येच समस्या येत असल्यामुळे प्रवाशांचे पैसे कापले जातात. मात्र हे पैसे तीन किंवा सात दिवसांत प्रवाशांच्या खात्यात जमा होतात. (प्रतिनिधी)>प्रवासी हैराणसातत्याने अशा घटना प्रवाशांबरोबर होत असल्याने आॅनलाईन सेवेचा उपयोग काय असा सवाल खुद्द प्रवाशांकडूनच उपस्थित केला जात आहे.