शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
2
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
3
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
4
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
5
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
6
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
7
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
8
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
9
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
10
सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना
11
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
12
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
13
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
14
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
15
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
16
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
17
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
18
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
19
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
20
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे

बुलडाण्यात उघड झाला होता ऑनलाईन लॉटरी घोटाळा

By admin | Updated: June 16, 2016 02:08 IST

तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी केली होती कारवाई.

राजेश शेगोकार / अकोलासध्या राज्यभर गाजत असलेला ऑनलाइन लॉटरी घोटाळा हा सन २00५ मध्येच बुलडाण्यात उघड झाला होता. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी बुलडाण्यातील ऑनलाइन लॉटरी सेंटरवर धाडी टाकून ७४ गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचे सूत्रधार हे मंत्रालयात असल्याने पुढे तपासावर नियंत्रण आल्याने ऑनलाइन लॉटरीचा हा गोरखधंदा सुरूच राहिला.२00१ ते २00९ या काळातील ऑनलाइन लॉटरीत मोठा घोटाळा झाला. लॉटरीतून वर्षाकाठी १0 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यातून तीन हजार कोटी प्राप्तिकर अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ ६00 कोटी भरून दोन हजार कोटींपेक्षाही अधिक प्राप्तिकर दडपला गेला. दरदिवशी निघणार्‍या ४३ ड्रॉ मधून शासनाचा ९00 कोटींचा महसूल बुडविला गेला. ही बाब आता समोर आली असल्याने या प्रकरणाची चर्चा रंगू लागली आहे. कृष्णप्रकाश हे बुलडाण्यात पोलीस अधीक्षक असताना त्यांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली होती. वरली मटका बंद केल्यामुळे नागरिक ऑनलाइन लॉटरीकडे वळले होते. वरलीपेक्षाही जास्त वेळा ऑनलाइन लॉटरीचा ड्रॉ होत असल्याने जुगार्‍यांसाठी ही पर्वणी होती. त्यामुळे कृष्णप्रकाश यांनी १६ डिसेंबर २00५ रोजी जिल्हाभरातील ऑनलाइन लॉटरी सेंटरवर धाडी टाकून तब्बल ७४ गुन्हे दाखल करून १४६ आरोपींना अटक केली होती तसेच ३0 लाखांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य जप्त केले होते. या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्या दरम्यान नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने सभागृहातही यासंदर्भात चर्चा झाली; मात्र कृष्णप्रकाश यांच्या तपास पथकाला पुढे सरकता आले नसल्याने ऑनलाइन लॉटरीचा हा गोरखधंदा सुरूच राहिला. हा प्रकार आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आघाडी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने बुलडाण्यातील कारवाईचे अनेकांना स्मरण होत आहे. विक्रेते अडकले, मोठे मासे बाहेरच !ऑनलाइन लॉटरी विक्रेत्यांवर कारवाई करून खर्‍या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा कृष्णप्रकाश यांचा प्रयत्न होता. त्यांनी तब्बल ७४ गुन्हे दाखल करून १४६ आरोपींना अटक केली होती व त्यापैकी ८६ आरोपींना पोलीस कोठडी मिळाली होती. या प्रकरणाचे खरे सूत्रधार हे मंत्रालयात असल्याचे समोर आल्यावर कृष्णप्रकाश यांच्या तपास पथकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. या कारवाई विरोधात आठ याचिका दाखल झाल्या होत्या. या प्रकरणातील सर्व आरोपी पुढे जामीनावर सुटले; मात्र खरे सूत्रधार बाहरेच राहिले.कविता गुप्ता अन् कृष्णप्रकाश यांचा सामना!ऑनलाइन लॉटरीच्या आयुक्त कविता गुप्ता आणि पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांचा सामना नांदेडपासून सुरू होता. नांदेड येथे पोलीस अधीक्षक असताना कृष्णप्रकाश यांनी ऑनलाइन लॉटरी विरोधात गुन्हे दाखल केले होते. पुढे ते बुलडाण्यात पोलीस अधीक्षक म्हणून आल्यावर त्यांनी नांदेडप्रमाणचे बुलडाण्यातही कारवाई केली. यावेळीसुद्बा लॉटरीच्या आयुक्त या कविता गुप्ताच होत्या.