शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘फॉरेन टूर’चा आॅनलाईन भूलभुलय्या

By admin | Updated: June 24, 2016 02:14 IST

‘फॉरेन टूर’च्या नावाखाली नागरिकांना लाखो रुपयांना गंडवण्याचा नवीन गोरखधंदा इंटरनेटद्वारे बोगस ट्रॅव्हल कंपन्यांकडून सुरू करण्यात आला असून, कमी खर्चाच्या ‘पॅकेज’ला बळी

पुणे : ‘फॉरेन टूर’च्या नावाखाली नागरिकांना लाखो रुपयांना गंडवण्याचा नवीन गोरखधंदा इंटरनेटद्वारे बोगस ट्रॅव्हल कंपन्यांकडून सुरू करण्यात आला असून, कमी खर्चाच्या ‘पॅकेज’ला बळी पडलेले नागरिक या भूलभुलय्यामध्ये अडकत चालले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पुण्यामध्ये दाखल झालेल्या सहा गुन्ह्यांमध्ये एक कोटीपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विविध ट्रॅव्हल वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार सुरू आहेत. परदेशवारीदरम्यान पंचतारांकित हॉटेल्समध्ये निवास व्यवस्था, मोटार प्रवास, विविध ‘डेस्टिनेशन्स’वर फिरवणे आणि खानपान याचा खर्च अशी सजवलेली आकर्षक पॅकेजेस ग्राहकांपुढे ठेवली जात आहेत. इंटरनेटवर तर हजारो ट्रॅव्हल एजन्सीच्या जाहिराती पाहायला मिळतात. गुगलमध्ये सर्च केल्यास शेकडो आॅफर्स समोर येतात. ग्राहक नेमक्या याच जाहिरातींना भुलत आहेत. उत्कृष्ट सेवा देण्याच्या नावाखाली मुलामा देऊन ग्राहकांसमोर आणलेल्या या जाहिरातींमधून फसवणुकीशिवाय दुसरे काही हाती लागत नाही. अशा प्रकारे फसवल्या जाणाऱ्यांमध्ये तरुणांपेक्षा प्रौढ किंवा वृद्धांचे प्रमाण अधिक आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात अनेक अर्ज दाखल होत असून, गेल्या काही दिवसांत पोलीस ठाण्यांमध्येही यासंदर्भातील गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल करण्यापेक्षा नागरिकांनी त्यापूर्वी योग्य खातरजमा करून तसेच संबंधित कंपन्यांची विश्वासार्हता तपासूनच आर्थिक व्यवहार केल्यास फसवणूक टाळली जाऊ शकते.घटना क्रमांक 1महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या ‘सुमती देशमुख इन्स्टिट्यूट आॅफ फॉरेन लँग्वेज फॉर वुमन’ या अभ्यासक्रमाच्या 20 विद्यार्थिनींना जर्मनीमध्ये अभ्यास दौऱ्याला जायचे होते. जर्मनीच्या हॅन ओव्हर युनिव्हर्सिटीने या विद्यार्थिनींना भेटीचे निमंत्रण दिले होते. या दौऱ्याच्या विमान प्रवासाचे तिकीट, व्हिसा, हॉटेल आणि जर्मनीतील वाहनव्यवस्था यासाठी ‘हॉलिडे वंडरेज’ या ट्रॅव्हल कंपनीच्या मयूर अशोक पाटील (रा. नीलकुंज अपार्टमेंट, प्रभात रस्ता) याने कमी खर्चाचे कोटेशन दिले. त्यामुळे संस्थेने त्यांच्याशी बोलणी केली. त्याने प्रत्येक विद्यार्थिनीकडून १ लाख २५ हजार असे सर्व विद्यार्थिनी व शिक्षकांचे मिळून २५ लाख रुपये धनादेशाद्वारे घेतले. पाटीलने व्हिसासाठी रद्द झालेली तिकिटे कागदपत्रांसोबत जोडली होती. त्यामुळे व्हिसा मिळाला नाही. दौऱ्याला काही दिवस शिल्लक असतानाच पाटीलने विद्यार्थिनींचे पैसे खर्च झाल्याचे सांगत आर्थिक फसवणूक केली.घटना क्रमांक 2मयूर अशोक पाटील याने त्याच्या हॉलिडे वंडर्स या ट्रॅव्हल एजन्सीद्वारे ग्राहक यशपाल देसाई (रा. आशियाना, समर्थनगर, वडगाव बुद्रुक) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, इटली इ. देशांत पर्यटनाला घेऊन जाण्याचे बुकिंग घेऊन १९ लाख २0 हजार रुपयांना गंडा घातला. देसाई आणि त्यांच्या परिवारातील पाच जणांना ‘फॉरेन टूर’ला जायचे होते. त्यासाठी वंडर हॉलिडेजमध्ये त्यांनी बुकिंग केले होते. हॉटेल, व्हिसा, विमानाची तिकिटे यासह परदेशातील वाहतूक यासाठी पाटीलने त्यांना १९ लाख २0 हजार भरायला लावले. त्यानुसार देसाई यांनी पैसे भरले. खात्यावर पैसे जमा होताच पाटीलने त्यांच्याशी संपर्कच तोडून टाकला.घटना क्रमांक 3दुबईच्या सहलीसाठी पैसे घेऊन व्हिसा रद्द झाल्याची बतावणी करीत ट्रॅव्हल्स डील बाजार या कंपनीने तीन प्रवाशांची आर्थिक फसवणूक केल्याचाही प्रकार समोर आला आहे. करण इदनानी (वय २८, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांच्या फिर्यादीवरून कंपनीच्या आदित्य व राहुल भसीन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इदनानी, त्यांचा भाऊ व सहकारी महिलेला दुबईला टूरसाठी जायचे होते. त्यांनी ट्रॅव्हल्स डील बजार या संकेतस्थळावर जाऊन संपर्क साधला. आरोपींनी त्यांना विमान तिकीट, दुबईमध्ये राहण्याची व्यवस्था आणि हॉटेल व्हिसा असे पूर्ण पॅकेज देऊ केले. त्यासाठी ७५ हजार रुपये आरोपींनी बँकेच्या खात्यावर भरणा करण्यास सांगितली. इदनानी यांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे पैसे भरले. परंतु कंपनीने इदनानी यांच्या सहकारी महिलेचा व्हिसा रद्द झाल्याचे कारण सांगत त्यांना पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली आहे.वंडर हॉलिडेकडून वृद्धाला गंडान्यूझीलंडमधील १३ रात्री आणि १४ दिवसांच्या सहलीसाठी वृद्धांकडून दहा लाख रुपये घेऊन वंडर हॉलिडेजच्या मयूर अशोक पाटील (रा. नीलकुंज अपार्टमेंट, प्रभात रोड) याने फसवणूक केली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात नारायण देशपांडे (वय ६४, रा. डहाणूकर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. देशपांडे आणि त्यांचे मित्र बाळकृष्ण पंढरीनाथ कटके यांना न्यूझीलंडला जायचे होते. त्यांच्यासाठी सहलीचे पॅकेज देऊन आरोपी पाटीलने दोघांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेतले. त्यांची कोणतीही टूर आयोजित न करून फसवणूक केली. कशा लुटतात या कंपन्या?इंटरनेटवर विविध पॅकेजेसची जाहिरात केली जाते. वेबसाईटवर नागरिकांना आकर्षित करणाऱ्या योजनांची जाहिरात करून त्यांच्याशी संपर्क साधला जातो. गोड बोलून त्यांना सुविधा देण्याचे आमिष दाखवले जाते. फॉरेन टुर्सचे पॅकेज पसंत पडल्यानंतर ग्राहकांना आॅनलाईन व्यवहाराद्वारे किंवा रोख स्वरूपात बँक खात्यांवर पैसे भरायला सांगितले जातात. पैसे भरल्यानंतर या कंपन्या पुन्हा ग्राहकांना कोणताही प्रतिसाद देत नाहीत.काय काळजी घ्याल?शक्यतो माहितीच्या आणि विश्वासार्ह ट्रॅव्हल कंपन्यांकडूनच टुर्सचे बुकिंग करावे.कमी खर्चामध्ये अधिक सुविधा कोणी देत असल्यास त्याची खातरजमा करावी.संबंधित ट्रॅव्हल कंपनी कोणाची, कुठली आहे याची सविस्तर माहिती घ्यावी.कोणत्याही व्यक्तीची प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नयेत. आॅनलाईन आर्थिक व्यवहार शक्यतो टाळावेत.ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयासह संबंधित व्यक्तींची विश्वासार्हता तपासून घ्यावी.अलीकडच्या काळात परदेशामध्ये सहलीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत. नागरिक कोणतीही खातरजमा न करता तसेच इंटरनेटवरील माहिती सत्य मानून पैसे गमावून बसतात. नागरिकांनी संबंधित ट्रॅव्हल कंपन्या, एजंट यांची विश्वासार्हता तपासावी. माहिती न घेता कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. कोणाची अशा प्रकारे फसवणूक झालेली असल्यास आर्थिक गुन्हे शाखेशी अथवा स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क साधावा. - दीपक साकोरे, उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा