शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा​​​​​​​ ऑनलाईन वीजबिल भरणा ३५ कोटींवर 

By appasaheb.dilip.patil | Updated: August 18, 2017 18:14 IST

सोलापूर : महावितरणच्या बारामती परिमंडलातील जवळपास एक लाख ६४ हजार ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी ३५ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा ऑनलाईन भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिले ऑनलाईन भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देबारामती परिमंडलात वाढता प्रतिसादई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध महावितरणच्या ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावारांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे

 

 

सोलापूर : महावितरणच्या बारामती परिमंडलातील जवळपास एक लाख ६४ हजार ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी ३५ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा ऑनलाईन भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिले ऑनलाईन भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याची स्थिती आहे. 

महावितरणने www.mahadiscom.in या वेबसाईटवर ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहणे आणि भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.

जुलै महिन्यात बारामती परिमंडलात एक लाख ६४ हजार ग्राहकांनी ३५ कोटी ३२ लाख रुपयांच्या वीजबिलांचे ऑनलाईन पेमेंट केले आहे. यात बारामती मंडलातील २६ हजार १५४ ग्राहकांनी ११ कोटी ६० लाख, सातारा मंडलातील ९८ हजार ३७८ ग्राहकांनी १२ कोटी ५० लाख तर सोलापूर मंडलातील ३९ हजार ६१७ ग्राहकांनी ११ कोटी २२ लाख रुपयांचा ऑनलाईन वीजबिल भरणा केला आहे. या माध्यमातून ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महत्त्व पटत असल्याचे दिसत आहे. आता इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून वीजबिल  भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालल्याने बिल भरणा केंद्रांसमोर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे. 

      महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी 'गो-ग्रीन' संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह वीजबिल ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.