शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन’ वीज देयकाची कोटीची उड्डाणे!

By admin | Updated: August 8, 2016 15:54 IST

वीज देयक भरण्यासाठी महावितरणच्या स्विकृती केंद्रांवर नागरिकांच्या रांगा हे चित्र आता बदलत असून, आधूनिक काळात ‘टेक्नोसेव्ही’ झालेल्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा

- अतुल जयस्वाल
 
अकोला, दि. 8 - वीज देयक भरण्यासाठी महावितरणच्या स्विकृती केंद्रांवर नागरिकांच्या रांगा हे चित्र आता बदलत असून, आधूनिक काळात ‘टेक्नोसेव्ही’ झालेल्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा ओढा आता देयक ‘आॅनलाईन’ भरण्याकडे अधिक झाला आहे.  जुलै महिन्यात जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील १३०२१ ग्राहकांनी तब्बल ३ कोटी ४३ लाख ६७ हजार ७८० रुपयांचे वीज देयक महावितरणचे संकेतस्थळ तसेच अ‍ॅपच्या माध्यमातून ‘आॅनलाईन’ भरल्याची माहिती समोर आली आहे.
आधुनिक काळात सर्वच व्यवहार  आता ‘आॅनलाइन’ होत असताना महावितरणने वीज बिल भरण्यासाठी संकेतस्थळावर ‘आॅनलाइन’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारेही वीज देयक भरता येते. ‘टेक्नोसॅव्ही’ झालेले वीज ग्राहक आता या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ उचलत आहेत. महावितरणच्या अकोला ग्रामीण व आकोट या  विभागाअंतर्गत येत असलेल्या अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, पातुर, आकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा उपविभाग आणि अकोला शहर या विभागाअंतर्गत येत असलेल्या ३ उपविभाग अशा १० उपविभागांमधील एकून १३०२१ वीज ग्राहकांनी जुलै २०१६ या एकाच महिन्यात ३ कोटी ४३ लाख ६७ हजार ७८० रुपयांचे वीज देयक भरले. यासाठी त्यांनी महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅपचा वापर केला. ग्रामीण भागातही आता ‘आॅनलाईन’ देयक भरण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.