शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"आॅनलाइन व्यवहार म्हणजे भ्रष्टाचाराविरोधातील लढा"

By admin | Updated: April 15, 2017 01:46 IST

देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व व्यवहार आॅनलाइन आणि कॅशलेस पद्धतीने सुरू केले आहेत. देशातील भ्रष्टाचार रोखण्याचा

मुंबई : देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व व्यवहार आॅनलाइन आणि कॅशलेस पद्धतीने सुरू केले आहेत. देशातील भ्रष्टाचार रोखण्याचा हा प्रयत्न आहे. आॅनलाइन व्यवहारांची सुरुवात ही एका अर्थाने भ्रष्टाचाराविरोधातील लढाईची सुरुवात असल्याचे मत शिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.केंद्र शासनाच्या निति आयोगाच्या वतीने देशभरात सुरू करण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या डिजीधन मेळाव्याचा समारोप आज पालकमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला, असे सांगून तावडे म्हणाले की, देशातील काळे व्यवहार पूर्णपणे बंद करण्याच्या उद्देशाने डिजिटल पेमेंट ही योजना सुरू करण्यात आली आहे. सामान्य माणसाला त्याचा फायदा मिळत आहे. डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे व्यवहार हे अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठरणार आहेत. डिजिटल व्यवहार ही अतिशय पारदर्शी यंत्रणा असून, त्याचा फायदा प्रत्येक नागरिकाने घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी डिजीधन योजनेअंतर्गत लकी ग्राहक योजना व डिजीधन व्यापार योजना यामध्ये निवडलेल्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच घोषवाक्य व लघुकविता स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)