शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा वांदा!

By admin | Updated: December 8, 2015 01:47 IST

घाऊक बाजारात कांद्याच्या भावामध्ये घसरण झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव आणि वणी येथे सोमवारी ‘रास्तारोको’ करून लिलाव बंद पाडले होते

नाशिक : घाऊक बाजारात कांद्याच्या भावामध्ये घसरण झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव आणि वणी येथे सोमवारी ‘रास्तारोको’ करून लिलाव बंद पाडले होते. ‘रास्तारोको’मुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने लिलाव पुन्हा सुरू झाले.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारच्या तुलनेत सोमवारी क्विंटलमागे भावात ९०० रुपयांची घसरण झाल्याने, संतप्त शेतकऱ्यांनी विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर सकाळी दीड तास ‘रास्तारोको’ केला. कांद्याचे किमान निर्यातमूल्य कमी न झाल्याने निर्यातदार व्यापारी लिलावात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे शनिवारच्या तुलनेत सोमवारी भाव घसरले. शेतकऱ्यांनी सकाळी कोटमगाव रस्त्यावर बस अडविली. दुपारनंतर लिलाव पूर्ववत झाले.पिंपळगावमध्ये गेल्या आठवड्यात कांद्याचा क्विंटलमागे भाव १,५०० ते २,४०० रुपये होता. सोमवारी मात्र व्यापाऱ्यांनी १,००० ते १,६७५ रुपये भावाने खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. त्यानंतर कांदा व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्यांसंबंधी जिल्हाधिकारी, तसेच केंद्र सरकारला निवेदन पाठविले. वणीतील बाजारभाव कोसळल्याने उत्पादकांनी लिलाव बंद पाडत वणी-पिंपळगाव रस्त्यावर ‘रास्तारोको’ केला. त्यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. पिंपळगावला लिलाव बंदपिंपळगाव (बसवंत) येथील बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवकेत झालेली वाढ व गेल्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास १ हजार रुपयांच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांनी सोमवारी कांद्याचे लिलाव बंद पाडले.