शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चासाठी कांदा मार्केट बंद राहणार!

By admin | Updated: September 20, 2016 03:09 IST

कोकण भवनवर २१ सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केट बंद ठेवण्यात येणार

नवी मुंबई : कोकण भवनवर २१ सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. इतर मार्केटमधीलही माथाडी कामगार व व्यापारी मोर्चात सहभागी होणार असून एपीएमसीमधून ट्रक, कार व मोटारसायकल रॅलीने सर्व जण मोर्चात सहभागी होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील मराठा समाजाचा मोर्चा कोकणभवनवर काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये नवी मुंबईमधील मराठा समाजाच्या सर्व संघटना, व्यापारी, कामगार यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. वाशीतील मराठा भवन व एपीएमसीच्या माथाडी भवनमध्ये झालेल्या नियोजन बैठकीला शेकडो नागरिकांनी हजेरी दाखविली होती. याशिवाय सानपाडा, नेरूळ, सीवूड व इतर शहरात सर्वच नोडमध्ये मराठा समाजातील नागरिकांनी बैठका घेवून सर्वांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी चळवळ उभी केली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे त्यांचे स्वप्न होते. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बहुतांश सर्व माथाडी कामगार कोकणभवनवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत. कांदा - बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी स्वत:हून मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये मार्केटमधून १५० मोटारसायकल, २०० कार व २० ट्रकची रॅली एपीएमसीमधून आंदोलनस्थळापर्यंत रॅली काढली जाणार आहे. खारघर उत्सव चौकातून सर्वजण पायी कोकणभवनपर्यंत मूक मोर्चात सहभागी होणार आहेत. माथाडी कामगारांप्रमाणे शहरातील मराठा समाजाच्या सर्व संघटना, बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर, वकील व इतर घटकांनी मोर्चाच्या तयारीसाठी बैठका सुरू केल्या आहेत. नवी मुंबईमधून एक लाखपेक्षा जास्त नागरिकांनी मोर्चासाठी उपस्थित राहावे यासाठी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक नागरिकाने मोर्चात सहभागी व्हावे यासाठी सोशल मीडियातून आवाहन केले जात आहे. नागरिकांनी फोन करून व घरोघरी जावूनही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून ग्रुप तयार करूनही मोर्चाच्या तयारीविषयी माहिती दिली जात आहे. राज्यभर होत असलेल्या मोर्चातील गर्दीचे व्हिडीओ व छायाचित्र पाठवून सहभागी होण्याचे आवाहन केले जात असल्याने कोकण भवनमधील मोर्चामध्येही प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)>मोर्चासाठी जय्यत तयारीमराठा क्रांती मोर्चासाठी येणारी वाहने उभी करण्यापासून ते मोर्चा शिस्तबद्धपणे काढण्यासाठीची तयारी सुरू आहे. शेकडो स्वयंसेवक यासाठी प्रयत्न करत आहेत. मोर्चासाठी कडक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. कुठेही घोषणाबाजी केली जावू नये. मोर्चाचे गांभीर्य जाईल अशाप्रकारे वर्तन कोणीही करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.