शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासासाठी ‘एक खिडकी’

By admin | Updated: July 18, 2016 02:42 IST

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी पुनर्विकासाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई : वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी पुनर्विकासाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी रहिवाशांशी खुला संवाद साधून पुनर्विकास योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ‘एक खिडकी’ योजना येत्या १५ दिवसांत सुरू करणार असल्याची ग्वाही दिली.धोकादायक इमारत म्हणजे नेमके काय, त्यांचा पुनर्विकास कोण करणार, धोकादायक इमारतींच्या यादीत नावच नाही असे अनेक प्रश्न तसेच नागरी सोयी-सुविधांबाबतच्या समस्यांवर याठिकाणी चर्चा करण्यात आली. या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. विकास नियंत्रण नियमावलीनुसार घ्यावयाच्या परवानगींविषयीची चर्चा याठिकाणी करण्यात आली. यामध्ये नागरिकांच्या शंकांचे निरसन केले तसेच नागरिकांच्या सूचनांनुसार कार्यप्रणालीत सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने कसा प्रयत्न करता येईल याचेही स्पष्टीकरण देण्यात आले. या कार्यशाळेदरम्यान नागरिकांसमोर नियमावली, पुनर्विकासाबाबतचा आराखडाच्या पॉवर पॉइंटच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. नगररचना विभागाच्या वेबसाईटवरही काहीच दिवसात हे सादरीकरण उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. नागरिकांना असलेल्या समस्या, शंका, सूचना, तसेच त्यांचे प्रश्न या कार्यशाळेत मांडण्यात आले. बिल्डरांनी पाच वर्षांपर्यंत इमारतींची देखभाल करावी असा नियम लागू करा, डिपी प्लान कधी होणार, वाशीतील जेएन २ टाईपच्या इमारतींची दुरवस्था, ज्येष्ठ नागरिकांनी लिफ्टसाठी एफएसआय मिळेल का अशा अनेक समस्या, सूचना या ठिकाणी मांडण्यात आल्या. पुनर्विकासासाठी सिडकोने सहभाग घ्यावा की नाही यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. विकासकामार्फत, स्वत:चे असोसिएशन करून, अथवा कंत्राटदारामार्फत पुनर्विकास करायचा हे सर्वस्वी त्यांनी ठरविणेच योग्य आहे अशी प्रतिक्रिया मुंढे यांनी व्यक्त केली. सिडकोने पुनर्विकास करावा की नाही हा निर्णय सर्वस्वी सिडकोवर अवलंबून असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिक्रिया)>एफएसआयबाबत संपूर्ण माहिती बेवसाईटवर उपलब्ध करून देणार नागरी सुविधा किती लोकसंख्येला देता येणार यानुसार एफएसआयचे गणित पुढच्या २० वर्षांचा विचार करूनच विकास आराखडा तयार करणार